"पोवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
No edit summary
ओळ ३:
'''पोवाडा''' हा [[वीर रस|वीर रसांतील]] लेखनाचा आणि गायनाचा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो. वीरांच्या पराक्रमांचे , विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्यासामर्थ्य , गुण , कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा, असा पोवाडा शब्दाचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे .
 
पोवाडे गाणारा कलाकारांस [[शाहीर]] म्हटले जाते. पोवाड्याचा उल्लेख [[ज्ञानेश्वरी]] मध्ये "पवद" असा केलेला आढळतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.
 
मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेऊन गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते. पोवाड्याची गीते रचणार्‍या आणि गाणार्‍या लोक कलावंतांना शाहीर म्हणतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.powade.com/|शीर्षक= महाराष्ट्रीय लोकगीते एक संग्रहण |प्रकाशक=पोवाडे.कॉम |दिनांक=२५ जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/पोवाडा" पासून हुडकले