"रावसाहेब रंगराव बोराडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
ओळ २:
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =रा._रं._बोराडे.jpg‎
| चित्र_शीर्षक = रा . रं. बोराडे
| पूर्ण_नाव = रावसाहेब रंगराव बोराडे
| टोपण_नाव = रा . रं. बोराडे
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९४०]]
| जन्म_स्थान = काटगाव, [[लातूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
ओळ २७:
}}
 
'''रारावसाहेब .रं.रंगराव बोराडे''' (पूर्ण नाव : रावसाहेब रंगराव बोराडे), (जन्म : २५ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मराठी भाषेतील एक लेखक आहेत. इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या ’पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना '''पाचोळाकार बोराडे''' हे नामाभिधान मिळाले आहे.
 
==जीवन वृत्तान्त==
ओळ ३४:
१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणार्‍या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. २०००साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.
 
त्याच वर्षी राज्य सरकारने बोराडे यांची [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या]] अध्यक्षपदी नेमणूक केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी गोदामांत सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करविली. {{संदर्भ हवा}} खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला.
 
==लेखन==
रा. रं. बोराडे यांच्या साहित्य लेखनाची सुरुवात अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली. १९५७ साली दैनिक सकाळला २५ वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त सकाळने राज्यस्तरीय कथास्पर्धा जाहीर केली. रा. रं. बोराडे तेव्हा इयत्ता दहावीत होते. त्यांनी आपली एक कथा स्पर्धेला पाठवून दिली. या कथेला स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. या कथेचे नाव होते ‘वसुली’. दहावीला असणार्‍याअसणाऱ्या बोराडे यांचे नाव अचानक साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या तोंडी खेळू लागले. १९६२ साली त्यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला. याच वर्षी त्यांना [[सत्यकथा]] या मासिकाने लिहिण्यासाठी निमंत्रित केले. सत्यकथामध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या.
 
==लेखन वैशिष्ट्ये==
बोराडेंच्या कथांमधल्या व्यक्ती ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. ग्रामीण भागातील गरीब दुबळ्या माणसांना त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केले. याशिवाय अत्यंत बेरकी आणि धोरणी माणसेही त्यांच्या कथांमधून भेटतात. रा. रं. बोराडे यांच्या कथा कादंबर्‍यांतकादंबऱ्यांत महिलांची व्यक्तिचित्रेही अत्यंत समर्थपणे आलीआहेतआली आहेत. त्यांच्या ‘नाती-गोती’ या कथासंग्रहात अशा महिला जवळपास प्रत्येक कथेत वाचकांना भेटतात. ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही रा.रं. बोराडे यांनी लिहिल्या. या कथांतून ते ग्रामीण माणसांच्या मनाचा ठाव घेतात. या लेखनगुणांमुळे बोराडे यांना मोठा वाचकवर्ग लाभला. महाराष्ट्रातच नव्हे, तर [[मराठी भाषा]भाषाऱ्] जाणणार्‍या भारतभरातील विविध प्रांतांत त्यांचा वाचकवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे भारतीय भाषांत तसेच इंग्रजीत अनुवाद झाले. त्यात ‘पाचोळा’ या कादंबरीचा समावेश आहे. ‘पाचोळा’ ही कादंबरी मराठीतील अभिजात कादंबर्‍यांतकादंबऱ्यांत समाविष्ट होते. मराठीतील वाचकप्रिय ‘टॉप टेन' कादंबर्‍यांतहीकादंबऱ्यातही तिची गणना केली जाते. ही कादंबरी लिहायला बोराडेंना तीन वर्षे लागली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11246318.cms
| शीर्षक =नवलेखकांच्या पाठीशी उभे राहण्यात खरा आनंद