"प्रतापगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
'''प्रतापगड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
==इतिहास==
[[छत्रपती शिवाजी]] महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे [[मोरोपंत पिंगळे]] यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.[[नीरा नदी]] आणि [[कोयना]] नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी [[शिवाजी महाराज]] आणि [[अफझलखान]] यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. [[इ.स.१६५९]] ते [[इ.स.१८१८]] या प्रदीर्घ कालावधीत [[इ.स.१६८९]] मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
 
==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे==
वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांची तलवार आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रतापगड" पासून हुडकले