"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q2465688
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ २७:
 
[[वर्ग:अहमदनगर जिल्हा]]
 
श्रीरामपूर, अहमदनगर जिल्ह्यात तसे नव्याने वसलेले शहर, आजच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे बेलापूर रेल्वे स्थानक "श्रीरामपूर"च्या जन्माचे मुख्य कारण. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व शनि शिंगणापूर या जागतिक कीर्तीच्या देवस्थानांचे सुवर्णमध्य असणारे श्रीरामपूर हे शहर तसे बघायला गेले तर निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे मुळचे रस्ते,बांधकाम व्यावसायिक गंगाराम नरसू डावखर हे आहेत. ब्रिटीश अधिकारी व काही लोकांचे वास्तव्य श्रीरामपूर परिसरात होते आसपास बाभळेश्वर, खंडाळा, वाकडी, नेवासा, टाकळी, शिरसगाव, वडाळा-महादेव, गोंधवणी वैगेरे गावे. उपजीविकेसाठी त्याकाळी बेलापूर कंपनीची स्थापना हरेगाव येथे करण्यात आली व डावखर पाटील यांनी आजच्या डावखर रोड परिसरात शेतीची सुरवात करत खंडोबा मंदिर उभारत ख-या अर्थाने श्रीरामपूर शहराची मुहूर्तमेढ रोवली. या शहराचे वैशिष्ट म्हणजे याला संबोधले जाणारे बिगर वेशीचे गाव. गंगाराम डावखरांचे सुपुत्र गोपाळराव यांनी १९१५ रोजी रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेले हनुमान मंदिर ग्रामदैवत आहे तर ब्रिटीशकाळी १९१४ रोजी भंडारदरा धरणातून कॅनॉलद्वारा आणले गेलेले पाणी श्रीरामपूरसाठी आजही संजीवनी सारखे काम करत आहे. मुबलक पाणीसाठा, रेल्वे स्टेशन, दळणवळणासाठी उपयुक्त रस्ते यामुळे श्रीरामपूरचा झपाट्याने विकास सुरु झाला १९२० टे १९२१ या काळात कॅनॉलचे पाणी थेट नेवासापर्यंत जावू लागल्याने पूर्वेकडील भागाचा विकास सुकर झाला व श्रीरामपूरकडे स्थलांतरित होत असंख्य कुटुंबांनी शेती व उद्योगधंदे सुरु केले.
१९२४ रोजी बेलापूर शुगर कंपनीने बेलापूर ब्रॅडी अॅड शुगर साखर कारखाना सुरु झाला व श्रीरामपूरच्या शेतकरी समूहाने उसाचे पीक घेणे पसंत केले. साखरेबरोबरच श्रीरामपूर गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाली व बहुतांश गुजरातमधील व्यापारी श्रीरामपूरकडे आकर्षित झाले. १९३१ च्या काळात स्व.डहाणूकर यांनी खंडाळा परिसरात टिळकनगर शुगर कारखाना सुरु केला श्रीरामपूर भोवती कान्हेगाव, सावळीविहीर, चांदेगाव, टिळकनगर व बेलापूर असे तब्बल ५ साखर कारखाने सुरु असल्याने व रेल्वे स्टेशनमुळे व्यापार करणे सहज शक्य होतो हे लक्षात आल्याने श्रीरामपूरची लोकवस्ती दिवसागणिक वाढतच होती. गुळाच्या पेढ्या, कापड व्यावसायिक, किराणा दुकानदार असे एक-एक करत आज जगाच्या पाठीवरील सर्व काही मिळणारे श्रीरामपूर येथे उपलब्ध आहे. १९३० मध्ये रामचंद्र महाराज उपाध्ये यांनी श्रीराम मंदिर व शेजारीच जैन मंदिर उभारले. गोपाळराव डावखर व सय्यद बाबा यांचे सलोख्याचे संबंध होते १९२६ ला सय्यद बाबा यांचे निधन झाले गोपाळरावांनी त्यांचे दफन करून त्याठिकाणी कबर बांधली व तेव्हापासून रामनवमीच्या दोन दिवस आधीसंपूर्ण भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानला जाणारा सय्यदबाबा उरूस व रामनवमी उत्सव आजही अखंडितपणे सुरु आहे. १९४० रोजी व्यापारी मर्चंट असो., १९४५ ला पहिली बँक बॉम्बे को.ऑप.बँक व नंतर भारत बँक आजची महाराष्ट्र बँकसह सर्व बँकांच्या शाखा श्रीरामपूरमध्ये आल्या. ब्रिटीश सरकारला श्रीरामपूरचे नाव जाधवनगर ठेवण्याची इच्छा होती परंतु स्थानिक लोकांच्या विरोधामुळे व तत्कालीन नेते रावसाहेब पटवर्धन, रामचंद्र महाराज उपाध्ये, आप्पासाहेब आगाशे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या विशाल मोर्च्यामुळे श्रीरामपूर हे नाव शक्य झाले. १९४७ ला नगर पालिका अस्तित्वात आली व रामचंद्र महाराज उपाध्ये श्रीरामपूरचे पहिले नगराध्यक्ष झाले. लगेचच श्रीरामपूर तालुका झाला. १९५० ला तहसील कचेरी व पहिला सहकारी साखर कारखाना धनंजय गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरु करत बाजारपेठ फुलवली. त्यानंतर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी तब्बल ३० वर्ष कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत समर्थपणे सहकाराची धुरा सांभाळली. १९५६ ला लोकमान्य टिळक वाचनालाय मेनरोड येथे सुरु झाले. स्व.निवृत्ती पा. बनकर यांनी आजचा अशोक सहकारी साखर कारखाना भोसले, पवार, जगताप, भांड, नाईक, कवडे, त-हाळ, आगाशे या सहकारी मित्रांना सोबत घेत १९५७ साली कारखाना उभारणी सुरु केली पुढे चालून स्व.भास्करराव गलांडे यांनी भक्कमपणे १४ वर्षे कारखाना सांभाळत सोबतच १९५७ ते १९६२ काळात तालुक्याचे आमदार म्हणून दमदार कामगिरी केली. १९६२ मध्ये स्व.अण्णासाहेब शिंदे यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार होत केंद्रीय मंत्रीमंडळात सलग १५ वर्षे कृषी मंत्री, राज्यमंत्री म्हणून काम करत कृषी क्षेत्रात अमुलाग्र यश मिळवून दिले. सोबतच रावसाहेब शिंदे यांनी १९६० पासून रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास सर्व पदांवर काम करत श्रीरामपूरला रयतचे शाळा, कॉलेज आणण्यात सहकार्य केले.तत्कालीन सुत गिरणी, कामगारांनी उभारलेले कामगार हॉस्पिटल(स्व.गंगाधर ओगले), सेंट-लुक हॉस्पिटल येथे सुरु असलेली निस्वार्थी रुग्णसेवा नाव उंचाविणारी आहे. स्व.रामराव आदिक, स्व.गोविंदराव आदिक यांनी राज्यासह देशात स्वकर्तुत्वाने ठसा उमटविला, स्व.गोविंदराव आदिक, कुशल प्रशासक मा.आ.स्व.ज.य.टेकावडे, अशोक सहकारी साखर कारखान्याचे तब्बल ३० वर्षांपासून नेतृत्व करणारे मा.आ.भानुदास मुरकुटे, नगरपालिका २५ वर्षांपासून ताब्यात ठेवणारे संयमी, शिर्डी साईबाबा विश्वस्त संस्थानचे मा.अध्यक्ष मा.आ.जयंत ससाणे, विद्यमान आ.भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आजवर श्रीरामपुरात विकासगंगा आणली आहे. विकासकामांना\ स्व.आदिक साहेब व स्व.टेकावडे यांच्या दुरोगामी नेतृत्वाने दिशा दिली व पुढील पिढीने तोच रस्ता मार्गक्रमण करत कार्य सुरु ठेवले...
तसे बघायला गेले तर खूप काही आहे लिखाणासाठी श्रीरामपूर विषयी....पुढील वेळी यात अजून भर घालेल व माझ्या श्रीरामपूरचे महत्व जगाला सांगेल...एकदा नक्की या माझ्या गावाला.....
 
 
आपलाच-
-केतन खोरे पाटील---> ०९९२३२९३३३३