"मृत समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q23883
No edit summary
 
ओळ १:
[[चित्र:Dead Sea by David Shankbone.jpg|thumb|मृत समुद्र (इस्राईल कडून जॉर्डनकडे पाहतांना)]]
'''मृत समुद्र''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: יָם הַ‏‏מֶּ‏‏לַ‏ח‎, ''याम हा-मला'';) हा [[इस्रायल|इस्राएल]] व [[जॉर्डन]] यांच्या दरम्यान पसरलेला एक भूवेष्टित समुद्र आहे. भौगोलिक दृष्टीने हा समुद्र वस्तुतः ''तलाव'' प्रकारात मोडतो. ३३.७ % एवढी, म्हणजे सर्वसाधारण समुद्राच्या पाण्यापेक्षा ८.६ पट अधिक [[सागरीय क्षारता|क्षारता]] असलेला हा समुद्र जगातील सर्वाधिक खारट जलाशयांमध्ये गणला जातो. [[जिबूती]]तील ''[[अस्साल सरोवर|लाक अस्साल]]'', तुर्कमेनिस्तानातील ''गाराबोगाझ्गोल'' असे मोजके जलाशय मॄत समुद्रापेक्षा अधिक खारे आहेत. या क्षारतेमुळे एकपेशीय प्राण्यांशिवाय इतर कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे यास मृत समुद्र असे म्हणतात. मृत समुद्र ६७ कि.मी. लांब व १८ कि.मी. रुंद विस्ताराचा असून [[जॉर्डन नदी]] ही या समुद्रास येऊन मिळणारी मुख्य नदी आहे. मृत समुद्र सर्वसाधारण समुद्र सपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली आहे. याची खोली ३०६ मीटर आहे.
 
[[चित्र:Dead Sea 1920px.jpg|thumb|right|200px|मॄत समुद्राचे उपग्रहातून टिपलेले दृश्य]]