"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Wikipedia python library v.2
ओळ ७:
 
{{भाषांतर}}
सस्तन प्राण्यांच्या नवजातांच्या पोषणासाठी मातेच्या स्तनातून नवजातांच्या जन्मानंतर स्त्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. फक्त सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूघ पाजून मोठे करतात. सस्तन प्राण्यामध्ये घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्धग्रंथीमध्ये होते. दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रामुख़्याने केसीन (प्रथिन) , आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण आहे. याशिवाय सोडियम,पोटॅशियम, कॅलशियम चे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्व असते. दुधामध्ये काहीं प्रमाणात जिवाणूप्रतिबंधक आणि कवकप्रतिबंधक विकरे असतात. सस्तन प्राण्यांच्या सर्वच जातीमध्ये दूध निर्मिती होते. सस्तन प्राण्यामधील दूध निर्मितीसाठी आवश्यक ‘कप्पा जीन’चा केसीन निर्मितीमध्ये महत्वाचा सहभाग आहे. हे जनुक नसल्यास सस्तन प्राण्यामध्ये दूधनिर्मिती होत नाही. या जनुकाचा शोध हैद्राबाद मधील सेंटर फॉर सेल अॅंधडअँधड मोलेक्युलर बायॉलॉजी या संस्थेमध्ये लागला आहे. स्तनी वर्गातील दूधनिर्मितीची जनुके एकसारखी असली तरी सर्व स्तनी वर्गामधील दुधामधील घटक आणि प्रतिकारद्रव्ये जातिनुसार भिन्न असतात.
दुधातील प्रथिनांच्या प्रमाणावर पिलाची वाढ किती वेगाने होणार हे अवलंबून असते. उदाहरणार्थ घोड्याच्या शिंगराचे वजन दुप्पट व्हायला साठ दिवस लागतात तर हार्प सीलचे पिलू पाच दिवसात दुप्पट वजनाचे होते. प्रतिलिटर मानवी दुधात 15 ग्रॅम प्रथिने असतात तर रेनडियरच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण 109 ग्रॅम असते.
मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणा-या दुधास कोलोस्ट्रम म्ह्णतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय,बकरी,उंट,म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीझ बनवण्याची पद्धत सु. दोन हजार वर्षापूर्वीची आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/दूध" पासून हुडकले