"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[File:Punica.granatum(01).jpg|thumb|डाळिंबाची झाडे ]]
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात. वनस्पतीशास्त्रीय नाव "प्युनिका ग्रॅनेटम" असे आहे. डाळिंबाला [[संस्कृत]]मध्ये "दाडिम' म्हणतात, व इंग्रजीत पोमग्रॅनेट. हे एक [[पित्त]]शामक [[फळ]] आहे. ही वनस्पती साधारण ३ते३ ते ५ मीटर उंच होते. या फळाचा उगम [[इराण]], [[अफगाणिस्तान]] आणि [[बलुचिस्तान]] येथे आहे असे मानले जाते.
 
==उपयोग==
डाळिंब ही एक [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी आहे. [[दाडिमाष्टक]], दाडिमादि चूर्ण, [[दाडिमाद्य तेल]] आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात{{संदर्भ हवा}}. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.{{संदर्भ हवा}}
[[हृदय|हृदयातील]] [[अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या]] मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. डाळींब खाणाऱ्यांची [[त्वचा]] तजेलदार राहण्यास मदत होते.
 
==महाराष्ट्रातील जाती==
* '''गणेश''' - बिया मऊ, चव गोड.
ओळ १४:
[[चित्र:आकाश झेप|चौकट|मध्यवर्ती| डाळिंब]]
 
==रोग==
डाळिंब बागेत तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होतो.
 
==लागवड==
 
[[कलम]] लावून डाळिंबाची लागवड करता येते. डाळिंबांची लागवड [[स्पेन]], [[इजिप्त]], [[अफगाणिस्तान]], [[पाकिस्तान]], [[ब्रह्मदेश]], [[चीन]], [[जपान]], [[रशिया]], [[अमेरिका]], [[इस्राईल]] आणि [[भारत]] या देशांमध्ये केली जाते. डाळिंब पिकाला उष्ण, दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण हिवाळा चांगला मानवतो.
 
===महाराष्ट्र===
भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन प्रमाण यांत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक]], [[नगर]], [[पुणे]], [[सांगली]], [[सोलापूर]] या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार व [[राहुरी]] हा भाग तर नाशिक जिल्ह्यातील [[कळवण]], [[सटाणा]], [[मालेगाव]], [[देवळा]] या भागात डाळिंबाची लागवड होते. भगव्या जातीच्या डाळिंबाला बाजारपेठेत मागणी असते.
यवतमाळ येथेही वृक्षवल्ली डाळिंब उत्पादन प्रकल्प, मुकुटबन असे प्रकल्प झाले आहेत. पिंपरी निर्मळ जिल्हा नगर येथेही प्रकल्प आहेत.
 
==निर्यात==
[[नाशिक]] येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. [[लासलगाव]] येथील विकिरण केंद्रात डाळिंबावर विकिरण प्रक्रियाही सुरू झाली आहे.
 
==पुस्तके==
* डाळिंब लागवड आणि उत्पादन - लेखक एस्. बी. पुजारी, लोकसंस्कृती प्रकाशन
* कल्पवृक्ष डाळिंब - लेखक डॉ. वि.ग.राऊळ, साकेत प्रकाशन.
==बाह्यदुवे==
* [http://omkarganesha.blogspot.com.au/2013/01/blog-post.html डाळिंब]
"https://mr.wikipedia.org/wiki/डाळिंब" पासून हुडकले