"दक्षिण कोरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 4 langlinks, now provided by Wikidata on d:Q884
छोNo edit summary
ओळ ५३:
'''दक्षिण कोरिया'''{{audio|En-us-South Korea.ogg|उच्चार}} हा [[पूर्व आशिया]]मधील एक [[देश]] आहे. हा देश [[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस [[उत्तर कोरिया]] हा देश तर पश्चिमेस [[पिवळा समुद्र]], पूर्वेस [[जपानचा समुद्र]] व दक्षिणेस [[पूर्व चीन समुद्र]] हे [[प्रशांत महासागर]]ाचे उप-[[समुद्र]] आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख [[चौरस किमी]] तर लोकसंख्या ५ कोटी असून [[सोल]] हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.
 
प्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. इ.स. ६६८ मध्ये कोरियामधील[[कोरिया]]मधील तीन राजतंत्रे एकत्र झाली व गोरेओ व जोसेओन[[चोसून]] घराण्यांनी कोरियावर इ.स. १९१०१८९७ पर्यंत राज्य केले. १८९७ ते १९१० दरम्यान हा प्रदेश [[कोरियन साम्राज्य]] ह्या नावाने ओळखला जात असे. २२ ऑगस्ट १९१० रोजी [[जपानी साम्राज्य]] व कोरियन साम्राज्यांदरम्यान झालेल्या तहानुसार जपानने सर्व कोरियावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. १९१० ते १९४५ सालांदरम्यान कोरियावर [[जपान]] देशाचीची सत्ता होती. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धामध्ये]] जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. उत्तर भागास [[सोव्हियेत संघ]]ाचा तर दक्षिण भागास [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] पाठिंबा होता. सोव्हियेत व अमेरिकेमधील मतभेदांमुळे ह्या दोन भागांचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले व १९४८ साली लोकशाही सरकार असलेला स्वतंत्र दक्षिण कोरिया देश निर्माण झाला. १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या [[कोरियन युद्ध|युद्धाची]] परिणती कायमस्वरूपी फाळणीमध्ये झाली. त्यानंतरच्या काळात कधी लोकशाही तर कधी लष्करी राजवट असलेल्या दक्षिण कोरियाने लक्षणीय प्रगती केली व केवळ ३० वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रूपांतर एका गरीब व अविकसित देशापासून जगामधील सर्वात श्रीमंत व विकसित देशांमध्ये झाले.
 
आजच्या घडीला [[आशिया]]मधील एक महासत्ता असलेल्या कोरियामध्ये कायमस्वरूपी लोकशाही सरकार असून तो आशियामधील चौथ्या तर जगातील १२व्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. निर्यातीवर अवलंबुन असलेली येथील अर्थव्यवस्था [[मोटार वाहन]], इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रे इत्यादींच्या उत्पादनामध्ये जगात आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया [[संयुक्त राष्ट्रे]], [[आर्थिक सहयोग व विकास संघटना]] व [[जागतिक व्यापार संघटना]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे [[विद्यमान]] सरचिटणीस [[बान की-मून]] हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत.
ओळ १३७:
|-
| 3
| [[इंचेवॉनइंचॉन]]
| <font size=3>인천광역시
| <font size=3>仁川廣域市
ओळ २१३:
==अर्थतंत्र==
== खेळ ==
[[ताईक्वोंदो]] ह्या ऑलिंपिक खेळाचा उगम दक्षिण कोरियामध्येच झाला. [[फुटबॉल]] व [[बेसबॉल]] हे देखील येथील लोकप्रिय खेळ आहेत.
दक्षिण कोरियाने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. राजधानी सोल हे [[१९८६ आशियाई खेळ]] व [[१९८८ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धांचे यजमान शहर होते तर [[२००२ आशियाई खेळ]] [[बुसान]]मध्ये भरवले गेले. [[जपान]]सोबत दक्षिण कोरियाने [[२००२ फिफा विश्वचषक]] स्पर्धेचे आयोजन केले होते. [[आशिया]] खंडामध्ये फुटबॉल विश्वचषक खेळवला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. भविष्यात [[२०१४ आशियाई खेळ]] दक्षिण कोरियामधील [[इंचॉन]] येथे तर [[२०१८ हिवाळी ऑलिंपिक]] प्याँगचॅंग येथे भरवले जातील.
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]