"प्रियांका चोप्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 46 langlinks, now provided by Wikidata on d:Q158957
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३४:
 
== कारकीर्द ==
[[फेमिना मिस इंडिया]] स्पर्धा जिंकल्यानंतर २००० मध्ये प्रियांका चोप्राने [[मिस वर्ल्ड|विश्वसुंदरीचा]] खिताबही पटकावला आणि ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते तमिळ चित्रपटातून. पण त्यानंतर ती लगेच बॉलीवूडमध्ये आली. हिंदी चित्रपटसृष्टीतला तिचा पहिला चित्रपट होता अनिल शर्मा दिग्दर्शित 'हिरो'. या चित्रपटामध्ये तिची दुय्यम भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे तिचं पूर्ण लक्ष त्यानंतर आलेल्या 'अंदाज' या चित्रपटावर होतं. या चित्रपटाला परीक्षकांकडून फार चांगली मतं मिळाली नाहीत. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर मात्र प्रियांकाकडे ग्लॅमरस भूमिकांची रांग लागली.
 
यशाबरोबरच प्रियांका चोप्राला बऱ्याच वादांनाही तोंड दयावं लागलं. आणि त्यावेळी प्रियांका चोप्राने 'राजा भैय्या' आणि 'जान कि बाझी' हे दोन चित्रपट सोडून दिले होते. तिचे 'प्लॅन' (२००४) आणि 'किस्मत' (२००४) हे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. 'असंभव' चित्रपटामध्ये तिची भूमिका केवळ ग्लॅमर वाढवण्यापुरती होती.