"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Robot-assisted disambiguation: कोलंबस - Marked as needing expert attention
ओळ ७३:
आपल्या वारशाबाबत कृष्णमूर्ती सजग होते. आपल्या शिकवणीचा अर्थबोधक कुणीही बनू नये अशी त्यांची इच्छा होती. मृत्यूपश्चात आपल्या सहकाऱ्यांनी कृष्णमूर्तींचे प्रवक्ते किंवा वारसदार असल्यासारखे वागू नये असे त्यांनी कित्येकदा बजावून ठेवले होते.
 
मृत्यूच्या काही दिवस आधी केलेल्या वक्तव्यात त्यांनी आपल्याला काय झाले होते ते कुणालाही समजलेले नाही आणि आपली शिकवणही कुणाला कळालेली नाही असे म्हटले होते. आपल्या आयुष्यकाळात कार्यरत असलेली अफाट ऊर्जा आपल्यासोबत जाईल असेही त्यांनी म्हटले होते. "...शिकवण जगल्यास" लोक त्या ऊर्जेकडे जाऊ शकतील आणि आकलन करवून घेऊ शकतील असा आशावादही त्यांनी मांडला होता. चर्चांदरम्यान कृष्णमूर्तींनी आपल्या भूमिकेची तुलना [[टॉमस एडिसन]] व [[कोलंबस]]{{dn}} यांच्याशी केली होती. नव्या जगाच्या शोधासाठी कोलंबसाला कष्टमय प्रवास करावा लागला, त्याच जगात आज जेटने सहज जाता येते असे कृष्णमूर्ती म्हणाले होते. याचा अर्थ काही प्रमाणात कृष्णमूर्ती "खास" असले तरी त्यांच्या आकलनाच्या स्तरापर्यंत पोहचण्यासाठी इतरांना खास असण्याची गरज नाही असा लावता येतो.
 
स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या एक्क्याण्णवाव्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८६ रोजी कृष्णमूर्तींचे निधन झाले.