"सिकलसेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ ६:
 
'''सिकल पेशी आजाराची आनुवंशिकता'''
सहाराच्या दक्षिणेस असणा-या मूल निवासी समुदायामध्ये मलेरिया आजारास प्रतिबंध होण्यास सिकल पेशी आजाराचे जनुक एका गुणसूत्रावर असल्यास अधिक प्रभावी ठरते. अकराव्या गुणसूत्राच्या असणा-या दोन्ही गुणसूत्रापैकी एका गुणसूत्रावर सिकल पेशी जनुक असल्यास मलेरियाची तीव्र लक्षणे दिसून येत नाहीत. दोन्ह्री गुणसूत्रावर असलेल्या जनुकास युग्मविकल्पी (अलील) म्हणतात. जनुके नेहमी जोड्यांच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ युग्मविकल्पी म्हणजे जनुक जोडी. युग्मविकल्पी समयुग्मकी-एकसारखे किंवा विषमयुग्मकी असू शकते. तसेच जनुक प्रभावी किंवा अप्रभावी असू शकते. अप्रभावी सिकल पेशी जनुक दोन्ही गुणसूत्रावर असल्यास सिकल पेशी आजाराची तीव्रता अधिक असते. पण अप्रभावी सिकल पेशी जनुक एका गुणसूत्रावर असून दुस-या गुणसूत्रावर सामान्य हीमोग्लोबिन जनुक असलेली व्यक्ती सिकल पेशी जनुकाच्या अपेक्षेने विषमयुग्मकी असते. अशा व्यक्तीचा आजार कमी तीव्रतेचा असतो.
सिकल सेल आजार अशी संज्ञा द्यावयाचे कारण म्हणजे या आजारामुळे रुग्णास अनेक व्याधीना सामोरे जावे लागते. याचा शेवट मृत्यूने होतो. हीमोग्लोबिन जनुकामधील सर्वच उपप्रकार कमी अधिक तीव्रतेचे आहेत.
 
'''सिकल पेशी आजारमुळे उद्भवणारे विकार.'''
सिकल पेशी आजारामुळे होणारी नेहमीची गुंतागुंत म्हणजे रक्तक्षय ‘अॅ निमिया’. याचा परिणाम रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येणे, प्लीहा या अवयवामध्ये रक्तपेशींचे विघटन होते. सिकल पेशी आजारात प्लीहेवर अति ताण पडल्याने प्लीहा मोठी होते. रक्तविघटनामध्ये अडथळे निर्माण होतात.
केशवाहिन्यामधून सिकल पेशी सुरळीतपणे वाहून नेल्या जात नसल्याने रक्त अवरोध निर्माण होतो. याच्या परिणामाने वेदना, आणि रक्तप्रवाह अवरोधामुळे उतीनाश होतो. वेदनाशामके घेतल्यानंतर किरकोळ तक्रारी दूर होतात. तीव्र वेदना थांबवण्यासाठी ओपियम (अफू) वर्गीय औषधांचा वापर करावा लागतो. फुफ्फुसे आणि शिस्नामधील रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आल्यास तातडीचे उपचार करावे लागतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सिकलसेल" पासून हुडकले