"श्रीफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: नारळ आपल्याला चारित्र्यपूजनाची प्रेरणा देते. बाह्य सौंदर्याच्य...
(काही फरक नाही)

१४:३२, २६ मे २००७ ची आवृत्ती

नारळ आपल्याला चारित्र्यपूजनाची प्रेरणा देते. बाह्य सौंदर्याच्या अभावामुळे कमीपणा न मानता नारळाने स्वतःचे अन्तर्सौंदर्य फुलवून दाखविले आहे आणि त्यामुळे "श्रीफळ" हे गौरववान नाव प्राप्त केले आहे.

बाह्यसौंदर्य मिळणे किंवा न मिळणे ही मानवाच्या हातची गोष्ट नाही. परंतु मानव जर मनात आणील तर स्वतःचे अन्तसौंदर्य यथेच्छ फुलवू शकतो. सॉक्रेटीस, ईसाप, अब्राहम लिंकन ह्यांच्या सारख्या लोकांनी स्वतःचे विचारसौंदर्य, गुणसौंदर्य ह्यामुळे स्वतःच्या बाह्य कुरूपतेला विसरायला लावले आहे. नारळाप्रमाणे सज्जनही बाह्य देखाव्याचा आग्रह राखीत नसल्यामुळे त्यांना ओळखणे फार कठिण जाते.

नारळ म्हणजे कुरूपता आणि सुंदरता, कठोरता आणि मृदुलता ह्यांचा समन्वय. जीवनात येणाऱ्या अनेक द्वद्वांचा जो योग्य समन्वय साधू शकतो तोच महान बनू शकतो. त्यालाच जीवनात खरी "श्री" सापडते.

मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यात येतो त्याच्या मागे बलिदानाचा भाव आहे. मनुष्य किंवा पशू ह्यांचे बलिदान देणाऱ्या प्राचीन मानवाला आपल्या ऋषींनी समजावण्याचा अविश्रान्त प्रयत्न केला. उपासनेच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या बलिदानाच्या मागे असलेल्या त्याच्या भावनेला समाधान देण्यासाठी ऋषींनी त्याला विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळाचे बलिदान देण्यास सुचविले. कोणतेही शुभकार्य बलिदान दिल्याशिवाय सफल होत नाही ह्या गोष्टीच्या स्मृती रूपात प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाची आवश्यकता स्वीकारण्यात आलेली आहे.

समुद्राचा खारटपणा हदयात साठवून लोकांना गोडपाणी देणारे श्रीफळ आपल्याला संदेश देते की, 'विश्वाचा खारटपणा हदयात साठव पण लोकांना तू गोडपणा देत जा. स्वधर्म पालनात कवटीप्रमाणे कठोर आणि अंतर्यामी मलईप्रमाणे नरम राहण्याचा बहुमोल जीवनमंत्र श्रीफळ आपल्याला देते.



हेदेखील पाहा

वैदिक प्रतीक-दर्शन