"कामेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष गोरे (चर्चा | योगदान) अनावश्क मजकूर खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ७३:
==इतिहास==
बागाडा साठी निसर्ग सपन्न… कामेरी गाव
'श्रावण मासी हर्ष मानसी' याचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या गावातच, कामेरी ला संपन्न निसर्ग आहे. काळी कसदार जमीन व त्याच बरोबर वा-याच्या झोतावर डुलणारे तरु वर अर्थात तरुवर म्हटल्या नंतर पक्षाचे सुस्वर आलेच…
आमच्या गावच्या काळ्या कसदार जमिनीचे खरे चीज झाले ते कॄष्णेच्या जलसिंचन योजनेमुळेच अर्थात हि जलसिंचन योजना पूर्णत्वास आली ती लोकनेते राजारामबापू पाटील व त्यांचे सुपुत्र आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब तसेच शामरावमामा पाटील यांच्या अखंड परीश्रमानेच काळ्या कसदार जमिनीतून अक्षरश: हिरव्या सोन्यानं सारा शिवार डुलू लागला. हे गाव पुणे - बेंगलोर हायवेवर वसले असून गावच्या पश्चिमेच्या टेकडिने या गावच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे ते कोल्हापूरच्या उत्तरेस चाळिस किलोमीटर व कराडच्या दक्षिणेस तीस किलोमीटरवर सांगली च्या वायव्येस चाळिस किलोमीटरवर वसले आहे. त्यामुळे कराड, कोल्हापूर व विशेषत: सांगली या शहराकडे या गावातील लोकांची येजा असून त्याच्या उत्तरेस ४ किलोमीटर इस्लामपूर हे शहर वसले आहे. या गावच्या पश्चिमेला परत हायवेवरून सहज दिसणारी दोन मंदिरे आहेत. त्यापैकि एक मुस्लिम धर्माची मस्जिद व दुसरे हिंदु धर्माचे श्री मारुती मंदिर आहे. विशेष म्हणजे ती इतक्या जवळ जवळ स्थापन झालेली आहेत. अशी धर्मांची प्रतीके अन्यत्र क्वचितच असतील यात शंका नाही. मदर इंडिया, टांगे वाला या हिंदी चित्रपटात व सुन माझी लक्ष्मी तसेच १२ मराठी चित्रपटात त्यांचे चित्रीकरण केले आहे. कामेरी गावात जशी श्री मारुती मंदिर आणि मस्जिद हि भव्य व सुदंर धार्मिक स्थळे आहेत. तसेच गावच्या पश्चिमेला श्री भवानी देवी व श्री अंबाबाई देवी, श्री बिरोबा मंदिर अशी अनेक सुंदर मंदिरे असून त्यातील श्री भवानी देवी व श्री अंबाबाई देवी, श्री कामेश्वरी या देवीच्या मूर्ती अतिसुदंर व देखण्या आहेत, मंदिराच्या समोरून सर्व आसमंत स्पष्ट व रम्य दिसतो. श्री भवानी टेकडीच्या पश्चिमेला एक छोटासा गुप्त कक्ष असून त्याचे दगडी फाडीचे इतिहासकालीन कोरीव बांधकाम असून शिल्प कलेचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते.
दुरवरुन इतिहासकार आणि ऎतिहासिक संशोधक त्या शिल्प कलेचा अभ्यास करण्या करीता येत असतात गावात इतिहाकालीन वास्तू कलेचा एक उत्तम रचना असलेला अतिभव्य वाडा होता सध्या बुरुज येथे पहावयास मिळतो. या वाड्याच्या परिसरातच श्री कामेश्वरी देवीचे मंदिर असून या देवीच्या नावावरून गावाला कामेरी हे नाव पडले.
तसेच या वाड्यात इतिहास कालीन दगडी चिरेबंदी बांधकाम असलेले गुप्त भुयार आहे. कामेरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ हे असून ग्रामदैवता ची वैशाख शुद्ध नवमी या दिवशी मोठी यात्रा भरते या परिसरातील हि सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे बगाड…. बगाड म्हणजे बैलांच्या जोड्या जुंपलेले भले मोठे लांबलचक शिड जोडलेला मोठा लाकडी गाडा होय. या बगाडा इतके प्रचंड बगाड महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याहि ठिकाणी पहावयास मिळत नाही अशी ख्याती आहे , या बगाडावर शंभर पेक्षा जास्त लोक एका वेळी बसू शकतात व 'श्री भैरवनाथाच्या नावान चांगभल' च्या गजरात यात्रेतील हे खास आकर्षण वाजत गाजत मिरवणुकीव्दारे काढले जाते.
स्वातंत्र्य पूर्व काळात आमदार रामचंद्र पाटील (कारभारी) व आमदार के.डी.पाटील (साहेब) यांनी गावचे नेतृत्व केले आहे. जेष्ठ नागरिक आणि स्वातंत्र्य पूर्व काळापासूनचे गावच्या विकासाचे शिल्पकार नि गावचे सरपंच पद भूषवलेले तुकाराम पाटील (बापु), भीमराव पाटील (आण्णा), भीमराव पाटील (छगन बापू), बाबासो पाटील (बापु), शामराव पाटील (मामा), संपत पाटील (आप्पा), बी.एल.पाटील (साहेब), तसेच जिल्हा परिषद सदस्य सुभाष भाळवणे (आबा) यांनी बरेच दीर्घ काळ गावाचे नेतृत्व करून गावच्या विकासात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख आजही आदर्शवत व अभिमानाने केला जातो. गावचा नावलौकिक अटकेपार पोहोचला आहे.
==प्रेक्षणीय किंवा पर्यटन स्थळे==
|