"रामकृष्ण विठ्ठल लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
[[File:Dr Bhau Daji.jpg|thumb|भाऊ दाजी लाड]]
डॉ. '''रामकृष्ण विठ्ठल लाड''' ऊर्फ '''भाऊ दाजी लाड''' ([[इ.स. १८२४]] - [[मे ३१]], [[इ.स. १८७४]]) हे [[मराठी]] इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते.
== जीवन ==
लाडांचा जन्म [[इ.स. १८२२|१८२२]] साली तत्कालीन पोर्तुगीज [[गोवा|गोव्यात]] मांजरे गावी, एका सामान्य [[गौड सारस्वत ब्राह्मण|सारस्वत]] कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची [[बुद्धिबळ|बुद्धिबळातील]] चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयात]] दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले. वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ [[नारायण दाजी लाड|नारायण]] यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाड देखील शिकून पुढे डॉक्टर बनले.
शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मय अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्चितीबद्दल, तसेच [[गुप्त साम्राज्य|गुप्तकालीन]] इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. [[इ.स. १८५०|१८५०]] साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते.{{संदर्भ}}
[[इ.स. १८५१|१८५१]] साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले. महारोगावरील औषधाचा त्यांनी लावलेला शोध, हे त्यांचे वैद्यकशास्त्रातील मोठे योगदान आहे.<ref>{{स्रोत बातमी | url=http://navshakti.co.in/mumbai/29781/ | title=शतकोत्तर वस्तुसंग्रहालय… | work=नवशक्ति | accessdate=19 सप्टेंबर 2013 | author=संकेत सातपुते | location=मुंबई}}</ref> त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह,
[[मे ३१]], [[इ.स. १८७४|१८७४]] रोजी लाड यांचे निधन झाले.{{संदर्भ}}
==संस्था==
मुंबईतील राणीच्या बागेत (नवीन नाव जिजामाता उद्यान) असलेल्या व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्युझियमचे नाव १९७५ साली बदलून [[भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय]] असे करण्यात आले.
==भाऊ दाजी लाड यांची चरित्रे==
* "समाजधुरीण डॉ. भाऊ दाजी लाड” : लेखक अ.प्र. जामखेडकर{{संदर्भ}}
* "डॉ. भाऊ दाजी लाड यांचे राजकीय व सामाजिक कार्य" : लेखिका डॉ. सुरेखा सावंत{{संदर्भ}}
* "डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे चरित्र" : लेखक श्रीनिवास नारायण कर्नाटकी{{संदर्भ}}
== संदर्भ आणि नोंदी ==
Line २६ ⟶ २४:
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:लाड, रामकृष्ण विठ्ठल}}
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी डॉक्टर]]
Line ३५ ⟶ ३३:
[[वर्ग:इ.स. १८२२ मधील जन्म]]
[[वर्ग:मुंबईचे नगरपाल]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
|