"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२६:
== सुरुवातीचे जीवन ==
[[चित्र:Young Ambedkar.gif|thumb|right|तरुण डॉ. आंबेडकर]]
मालोजीराव हे रामजींचे वडील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा होते. मालोजी [[ब्रिटिश भारतीय लष्कर|इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात]] [[शिपाई]] म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> मालोजीरावांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतर मुलगीचा मिराबाई यांचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले [[रामजी सकपाळ|रामजी]] हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> शिक्षण सुरु असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय [[भीमाबाई सकपाळ|भीमाबाईंशी]] झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात [[सुभेदार]] या पदावर होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref> रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत [[कबीर]]ाचे दोहे, [[ज्ञानेश्वर]], [[नामदेव]], [[चोखामेळा|चोखोबा]], [[एकनाथ]], [[तुकाराम]] इत्यादी संतांचे [[अभंग]] पाठ केले होते. ते रोज [[ज्ञानेश्वरी]] वाचत, सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरु झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref> मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४|language=मराठी}}</ref> रामजींना उत्तम शिक्षण बनवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात '[[सुभेदार]]' पदाचीही बढती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४ व ३५|language=मराठी}}</ref> रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref>
 
रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये [[मध्य प्रदेश]]ातील [[महू]] येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref> या काळात [[एप्रिल १४|१४ एप्रिल]] [[इ.स. १८९१|१८९१]] रोजी [[डॉ. आंबेडकर नगर|महू]] (सध्या [[डॉ. आंबेडकर नगर]]) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref> रामजींनी [[मराठी भाषा|मराठी]] व [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाई]] यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. [[आंबेडकर कुटुंब|आंबेडकरांचे कुटुंब]] हे त्याकाळी [[अस्पृश्य]] ([[दलित]]) गणल्या गेलेल्या [[महार]] जातीचे होते आणि महाराष्ट्रातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[मंडणगड]] तालुक्यातील [[आंबडवे]] या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चूकिचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/pune-news/about-name-of-ambadve-village-1227278/|title=आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे|date=2016-04-14|work=Loksatta|access-date=2018-03-14|language=mr-IN}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/kgtocollege-news/international-standard-educational-complex-at-original-village-of-dr-babasaheb-ambedkar-446635/lite/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta|website=www.loksatta.com|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref>) अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत [[दापोली]] या गावातील 'कॅम्प दापोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता न आल्याने घरीच लहानग्या भीमरावास [[अक्षर]] ओळख करून द्यावी लागली. इ.स. १९९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व [[सातारा]] येथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील 'कॅम्प स्कूल' या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref> या वर्षीच त्यांनी [[कबीर पंथ]]ाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत [[इ.स. १८९६]] मधे [[मस्तकशूळडोकेदुखी|मस्तकशूल]] या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४१|language=मराठी}}</ref> त्यानंतर बालक भीमाचे व अन्य मुलांची संगोपन त्यांच्या मीरा आत्यांनी केले आणि कठीण परिस्थितीत ते जगले.
 
[[इ.स. १८९६]] मध्ये रामजींनी आपल्या परिवारासह [[दापोली]] सोडली व ते [[सातारा]] येथे एका साधारण घरात राहिले, आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी [[इ.स. १८९६]] च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. [[इ.स. १८९८]] साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. भीमरावाचे मूळ गाव कोकणातील [[आंबडवे]] व मूळ आडनाव ''सकपाळ'' होते. साताऱ्यातील कॅम्प स्कूल मधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२|language=मराठी}}</ref> [[कोकण]]ामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी ([[उपसर्ग (संस्कृत व्याकरण)|उपसर्ग]]) ''कर'' शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील [[रामजी सकपाळ|रामजी आंबेडकर]] यांनी [[सातारा|साताऱ्यातील]] गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे [[प्रतापसिंह हायस्कूल]]) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (''अंबावडेकर'' हा चूकीचा उल्लेख<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref>) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे [[देवरूखेदेवरुखे ब्राह्मण]] शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. तेव्हा त्यावर भीमरावांनी होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे '[[आंबेडकर]]' असे झाले. नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा पास केली व यावर्षीच रामजी सकपाळ [[मुंबई]]ला सहपरिवार गेले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४४|language=मराठी}}</ref>
 
डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ [[मुंबई]]ला सहपरिवार आले व तेथील 'लोअर परळ' भागातील 'डबक चाळ' नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४४|language=मराठी}}</ref> [[मुंबई]]मधे भीमराव हे एलफिन्स्टन[[एल्फिन्स्टन रोड|एल्फिन्स्टन रस्त्यावरील]] सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1900s.html|title=1900s|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-14}}</ref> [[कबीर पंथ]]ीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा [[पेला|पेल्याला]] स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे कार्य सहसा शालेय शिपायाद्वारे केले जात असे आणि जर शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे. शाळेत असतानाच [[इ.स. १९०६]] मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न [[दापोली]]च्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses|last=Kapadiya|first=Payal|publisher=Wisha Wozzawriter published by Puffin|year=2012|isbn=|location=Mumbai|pages=14}}</ref> [[इ.स. १९०७]] साली तरूण भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४९-५०|language=मराठी}}</ref> मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृ.अ. केळुसकर गुरूजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच [[गौतम बुद्ध|बुद्धांच्या]] शिकवणूकींची माहिती कळाली व बुद्धाकडे वळले.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१२२|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५०|language=मराठी}}</ref> आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी [[इ.स. १९०८]] रोजी भीमरावांनी [[एल्फिन्स्टन महाविद्यालय]]ात प्रवेश घेतला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५१|language=मराठी}}</ref> पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची [[राज्यशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी २०१२ रोजी त्यांना पहिला मुलगा [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] झाला. त्याच सुमारात [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१३]] मध्ये त्यांचे आजारी रामजीवडील बाबांचेरामजींचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन अमेरीकेतील [[कोलंबिया विद्यापीठ]]ात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|author=Frances Pritchett |दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html |शीर्षक=youth |प्रकाशक=Columbia.edu |accessdate=17 July 2010| archiveurl= http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html| archivedate= 25 June 2010 | deadurl= no}}</ref>
 
== उच्च शिक्षण ==