"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १४३:
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar in Columbia University.jpg|thumb|right|१९१३-१६ दरम्यान कोलंबिया विद्यापीठात असताना विद्यार्थी डॉ. आंबेडकर]]
 
बी.ए. उत्तीर्ण झाल्यामुळे भीमरावांना पुढतीपुढील वाटचाल करण्यासाछीकरण्यासाठी काही पर्याय खुले झाले. नोकरी करणे व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, हा एक पर्याय होता तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, हाही एक पर्याय होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५३|language=मराठी}}</ref> महाराज [[सयाजीराव गायकवाड]] बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी भीमराव महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराज काही बोलले नाही मात्र त्यांनी भीमरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणे व त्यासाठी भीमरावांना अमेरिकेत पाठविणे, पसंत केल्याचे सांगितले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५४|language=मराठी}}</ref> महाराजांनी भीमरावांना होकार दिल्यामुळे ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५४|language=मराठी}}</ref> या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करू लागले व २१ जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील [[न्यूयॉर्क]] येथे पोहचले. या शहरातील [[कोलंबिया विद्यापीठ]]ामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५५|language=मराठी}}</ref> त्यांनी या विद्याभ्यासासाठी प्रमुख विषय म्हणून [[अर्थशास्त्र]] हा विषय निवडला आणि जोडीचा इतर विषय म्हणून [[समाजशास्त्र]], [[इतिहास]], [[राज्यशास्त्र]], [[मानववंशशास्त्र]] आणि [[तत्त्वज्ञान]] हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांच्या पुस्तकांचे भरपूर वाचन केले व दोन्ही विषयांवर अभ्यासपूर्ण प्रभुत्व मिळवले. यामुळे विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५६ व ५७|language=मराठी}}</ref>
 
दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात [[लाला लजपतराय]] यांनी भीमरावांशी ओळख करुन घेतली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७|language=मराठी}}</ref> भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लाला लजपतराय व विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक [[एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन|एडवीन सेलिग्मन]] तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७|language=मराठी}}</ref> प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे ज्ञान ऐकून होते. लजपतराय यांनी भीमरावांच्या ज्ञानाची स्तूती केली. त्यावेळीत्याचवेळी सेलिग्मन यांनी लजपतरायांसमोर विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्याबद्दलआंबेडकरांबद्दल गौरोद्गार काढले की, "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत."<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७|language=मराठी}}</ref><ref>डॉ. आंबेडकरांचे अंतरंग – ले. द.न. गोखले</ref>
 
एम.ए. च्या पदवीसाठी भीमरावांनी 'एन्शंट इंजियन कॉमर्स' (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए. ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर 'अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी' नावाचे प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७ व ५८|language=मराठी}}</ref><ref>डॉ. आंबेडकरांचे अंतरंग – ले. द.न. गोखले</ref>
 
त्यानंतर भीमरावांनी पीएच.डी. पदवीसाठी 'द नॅशनल डिविडेंट ऑफ इंडिया: अ हिस्टोरीकल अँड ॲनलिटीकल स्टडी' (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरु केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५८|language=मराठी}}</ref><ref>डॉ. आंबेडकरांचे अंतरंग – ले. द.न. गोखले</ref> सन १९१७ मध्ये विद्यापीठाने पीएत्यांचा प्रबंध स्वीकारुन त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी) ची पदवी प्रदानदेण्याचे केलीमान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध पुस्तक छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच भीमरावांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल. मात्र पीएच.डी. चा डॉक्टरेट प्रबंध स्वीकारल्यामुळे सन १९१७ मध्येच विद्यापीठाने भीमरावांना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) चालवण्याची अनुमती दिली आणि भीमराव रामजी आंबेडकर 'डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर' झाले. प्रा. सेलिग्मन आंबेडकरांचे पी.एचपीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.<ref name=":3">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-31}}</ref> आंबेडकरांनी इ.स १९१३ ते इ.स. १९१७ या कालावधीत आपलाआपल्या पीएच.डी. प्रबंध लिहिला. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे इ.स. १९२५ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला मात्र यावेळी ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ असे करण्यात आले. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. डॉ. भीमराव आंबेडकरांनी आपल्याला उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोदा संस्थानचे राजेमहाराज सयाजीराव गायकवाड यांना हा ग्रंथ अर्पण केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://drbacmahad.org/Speeches/the-evolution-of-provincial-finance-in-british-india.pdf|title=The Evolution of Provincial Finance in British India|last=Ambedkar|first=B.R.|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>
 
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ''[[ए.ए. गोल्डनवायझर]]'' यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला नवीन शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार [[भारतातील जाती]] : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी हा शोधनिबंध वाचला. कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर [[जॉन ड्युई]] यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच बाबासाहेब आंबेडकरांनी 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा प्रथम अनुभव घेतला. “कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले.”, असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ २ वर्षांतच पूर्ण केला आणि इ.स. १९१६ मध्ये लंडनला गेले.<ref name=":3" />
 
=== लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन ===