"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
==प्रस्तावना==
'''डॉ. भीमराव रामजी आंबेडकर''' (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' नावाने लोकप्रिय, हे [[भारतीय]] [[कायदेपंडित|न्यायशास्त्रज्ञ]], [[अर्थशास्त्रज्ञ]], [[राजकारण|राजनीतिज्ञ]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] आणि समाजसुधारक होते. त्यांनी [[दलित बौद्ध चळवळ]]ीला प्रेरणा दिली आणि [[अस्पृश्य]] ([[दलित]]) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी मोहीम राबविली, तसेच महिलांच्या, कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|पहिले कायदा व न्याय मंत्री]], [[भारताचे संविधान|भारतीय राज्यघटनेचे]] शिल्पकार, [[भारतामधील बौद्ध धर्म|भारतीय बौद्ध धर्माचे]] पुनरुज्जीवक आणि [[भारत|प्रजासत्ताक भारताचे]] पिता होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-03-16}}</ref> भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना '[[बाबासाहेब]]' म्हणतात, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय.
[[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या शिक्षण संस्थांमधून [[अर्थशास्त्र]] विषयात [[डॉक्टरेट]] पदव्या मिळवणारे आंबेडकर हे प्रतिभाशाली विद्यार्थी होते; तसेच त्यांनी [[कायदा]], [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयांवरील संशोधनासाठी अभ्यासक किंवा विद्वान म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक [[अर्थशास्त्रज्ञ]], [[प्राध्यापक]] आणि [[वकील]] होते. त्यानंतर त्यांचे जीवन सामाजिक व राजकीय घडामोडींत व्यतित झाले; ते [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यासाठी]] प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
|