'''शंकरराव रामचंद्र खरात''' ([[जुलै ११]], [[इ.स. १९२१|१९२१]] - [[एप्रिल ९]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. ते [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे]] कुलगुरूहीकुलगुरू म्हणून सुद्धा कार्यरत होते. खरातांचा जन्म [[आटपाडी]] येथे झाला. 'तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 'मी स्वत: [[महात्मा फुले]], शाहू महाराज व डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विचारांचा शिष्य आहे' असे ते नेहमी म्हणत. इ.स. १९५८ ते १९६१ या काळात [[प्रबुद्ध भारत]] या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. इ.स. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
शंकरराव खरात हे यांचा जन्म [[आटपाडी]] येथे झाला. `तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र गाजले. `मी स्वत: [[महात्मा फुले]], शाहू महाराज व डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विचारांचा शिष्य आहे` असे ते नेहमी म्हणत. इ.स. १९५८ ते १९६१ या काळात `[[प्रबुद्ध भारत]]` या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. इ.स. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते..
`'शंकराण्णा तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगूळलाच साहित्य संमेलन घेऊ `.' असे माडगूळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याप्रमाणेच प्रा. [[गंगाधर गाडगीळ]], [[अरविंद गोखले]], [[शंकर पाटील]], प्रा. [[द.मा. मिरासदार]] यांच्यासोबत आचार्य [[प्र.के. अत्रे]], [[शिरीष पै]] यांनी त्यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. इ.स. १९५७ साली त्यांची नवयुग दिवाळी अंकात, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी `'सत्तूची पडीक जमीन `' नावाची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा त्यांनी नवयुगमध्येच लिहिल्या.
इ.स. १९५७-५८ मध्ये शंकरराव खरातांची `'माणुसकीची हाक' ही [[महार]] बलुतेदारावर[[बलुतेदार]]ावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे ते पुढे लेखक म्हणून उदयाला आले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले.