"महदंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: सुचालन साचे काढले |
No edit summary |
||
ओळ ५७:
==व्यतिगत माहिती==
महादाईसा यांचे जीवन विलक्षण होते. बालविधवा ते विद्वान संन्यासिनी, कवयित्री असा प्रवास तिने केला. महादाईसाचे घराणे तसे विद्वानांचेच होते. त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहान वयातच झाले. परंतु पतीचे लवकर निधन झाल्याने वैधव्य आले. ती वडिलांकडे परत आली. भक्तिमार्गाची व परमार्थाची त्यांना ओढ होती. परमार्थाच्या ओढीने प्रथम त्या दादोसाच्या शिष्या झाल्या. त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. श्री चक्रधर स्वामींनी सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतले. महानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=१०१ कर्तृत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१७}}</ref> संन्याशाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईसेने स्वीकारला. संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत रममाण होताना तिच्या व्यक्तिमत्त्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली. त्यांची भक्ती डोळस होती. बुद्धीची, चौकसपणाची त्याला जोड होती. महादाईसेला श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती.
==महदंबेच्या जन्मस्थळाचा वाद==
महदंबा जालना जिल्ह्यातील होती, असा उल्लेख [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]ाच्या कार्यवाह संजीवनी तडेगावकर यांनी संमेलनाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात केला. परंतु कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण येथील असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषण संपताना सभागृहात उपस्थित असलेले महदंबा मासिकाचे कार्यकारी संपादक उद्धवराज प्रज्ञासागर उभे राहिले आणि महदंबा जालना जिल्ह्यातल्या रामसगावची असल्याचे सांगितले. संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ (???) या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी मात्र महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.
महानुभाव पंथातील महदंबा ही आद्यकवयित्री मानली जाते, असे सांगून ती कोणत्या जिल्ह्यातील होती यावर वाद करण्याची गरज नाही, असे डाॅ. [[छाया महाजन]] म्हणाल्या.
== काव्ये ==
|