"कृष्णा किरवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ भर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
कृष्णा किरवले व सुतारकाम करणाऱ्या प्रीतम पाटील या दोघांतील वाद विकोपाला गेल्याने त्याने डॉ. किरवले यांचा त्यांच्या राहत्या घरी खून केला. त्या आरोपाखाली त्याला अटकही झाली आहे. या प्रकरणी प्रीतमची आई मंगला पाटील यांनी खुनातील पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केल्याने त्यांनाही सहआरोपी करून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनी दिली.
 
डॉ. किरवले यांची नाशिक येथील मुक्त विद्यापीठात नियुक्ती झाल्याने ते कोल्हापुरातील रो बंगलो विकून पुण्याला जाणार होते. किरवले यांचे राजेंद्रनगर येथील राहते घर प्रीतम पाटील याने खरेदी केले होते. सहा महिन्यांपूर्वी किरवले यांनी याबाबतचा व्यवहार प्रीतमसह त्याच्या वडिलांशी केला होता. त्या वेळी घराची किंमत ४६ लाख रुपयांना ठरली होती. प्रीतमने किरवले यांना वेळोवेळी ३६ लाख रुपये दिले होते. मात्र किरवले आपणास २६ लाख रुपयेच मिळाल्याचे सांगत होते. या कारणातून प्रीतम व डॉ. किरवले यांच्यात वाद झाला होता. जानेवारीत डॉ. किरवले यांनी घराची किंमत आणखी २० लाख रुपयांनी वाढल्याचे प्रीतमला सांगितले. यातून या दोघांतीलदोघांत वाद विकोपाला गेला होताझाला.
 
२४-२-२०१७ रोजी डॉ. किरवले, गणपती पाटील, प्रीतम पाटील यांच्यामध्ये करार झाला. यामध्ये बाजारभावानुसार किरवले यांच्या बंगल्याची किंमत २३ लाख रुपये नमूद करण्यात आली होती. याच कारणातून सायंकाळी प्रीतम चर्चेसाठी किरवले यांच्या घरी गेला होता. बंगल्याच्या खरेदी रकमेतील फरक व व्यवहारातील वाढीव रक्कम यातून किरवले व प्रीतम यांच्यात वाद झाला. याच रागातून प्रीतमने किरवले यांच्यावर वार करून खून केला, असे पोलिसांनी सांगितले.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/suspicious-death-of-renowned-thinker-dr-krishna-kirawale-in-kolhapur/articleshow/57451041.cms</ref>
 
३ मार्च २०१७ रोजी दुपारी चारच्या सुमारास प्रीतमने किरवलेंच्या घरी जाऊन चर्चा केली. मात्र वाद विकोपाला गेल्याने त्याने सुतारकामाच्या साहित्यातील एडक्याने किरवले यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अतिरक्तस्रावाने किरवले यांचा जागीच मृत्यू झाला.
 
==सन्मान==