विल्यम हट कर्झन वायली
सर विल्यम हट कर्झन वायली (ऑक्टोबर ५, इ.स. १८४८:चेल्टनहॅम, इंग्लंड - जुलै १, इ.स. १९०९:लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश राजवटीतहत भारतीय सेनाधिकारी आणि नंतर ब्रिटिश राजचा अधिकारी होता. हा बडोदा आणि हैदराबाद संस्थानांमध्ये रेसिडेंट होता.
बंगालची फाळणी करण्यात याचा हात होता. याकारणास्तव मदनलाल धिंग्राने लंडनमध्ये याची गोळ्या झाडून हत्या केली.