विल्यम डॅलरिंपल(इंग्लिश:William Dalrymple;) (मार्च २०, इ.स. १९६५ - हयात) हा प्रख्यात इतिहासकार आणि प्रवासवर्णनकार आहे. तसेच तो उत्तम निवेदक, समीक्षक, कलाइतिहासकार आणि आशियातील सगळ्यांत मोठ्या साहित्यसंमेलनाचा संस्थापक व सहसंचालक आहे.

विल्यम डॅलरिंपल
जन्म नाव विल्यम हॅमिल्टन-डॅलरिंपल
जन्म मार्च २०, इ.स. १९६५
स्कॉटलंड
राष्ट्रीयत्व स्कॉटिश
साहित्य प्रकार ऐतिहासिक, प्रवासवर्णने
अपत्ये

विल्यम डॅलरिंपल हा हॅमिल्टन-डॅलरिंपल घराण्यातील दहावे बॅरोनेट सर ह्यू हॅमिल्टन-डॅलरिंपल यांचा मुलगा होय व ते प्रख्यात ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ हिचे नातलग होत. त्याचे शिक्षण केंब्रिजातील अँपलफोर्थ कॉलेज व ट्रिनिटी कॉलेज येथे झाले. तेथे त्याने इतिहास विषयात शिष्यवृत्ती व विशेष नैपुण्य प्राप्त केले.

इ.स. १९८९ सालापासून विल्यम डॅलरिंपलाने लेखनविषयक संशोधनकार्यासाठी वेळोवेळी नवी दिल्ली येथे वास्तव्य केले आहे. त्याची पत्नी ऑलिव्हिया फ्रेझर ही कलाकार आहे. या दांपत्याला इब्बी, सॅम आणि अ‍ॅडम अशी तीन मुले असून अल्बिनिया नावाचा एक कॉकटू या परिवारातील एक सदस्य आहे. डॅलरिंपल न्यू स्टेट्समन या ब्रिटिश साप्ताहिकाचा दक्षिण आशियातील वार्ताहर म्हणून इ.स. २००४पासून कारभार सांभाळतो. तो रॉयल एशियाटिक सोसायटीरॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर या संस्थांचा फेलो आहे.

प्रकाशित साहित्य

संपादन
  1. इन शानातू (इ.स. १९८९)
  2. सिटी ऑफ जिन्स (इ.स. १९९४)
  3. फ्रॉम द होली माउंटनः अ जर्नी इन द शॅडो ऑफ बायझंटिअम (इ.स. ११९७)
  4. द एज ऑफ काली (इ.स. १९९८)
  5. व्हाइट मुघल्स (इ.स. २००२)
  6. बेगम्स्, ठग्स् अँड व्हाइट मुघल्स - द जर्नल्स ऑफ फॅनी पार्क्स (इ.स. २००२)
  7. द लास्ट मुघल, द फॉल ऑफ डायनॅस्टी, डेल्ही १८५७ (इ.स. २००६)
  8. नाइन लाइव्ह्ज्: इन सर्च ऑफ द सेक्रेड इन मॉडर्न इंडिया. ब्लूम्सबरी, लंडन. (इ.स. २००९) आयएसबीएन क्रमांक: ९७८-१-४०८८-००६१-४