विलासराव साळुंखे हे भूमिहीन मजुरालादेखील पाण्याचे समान वाटप व्हावे , या मागणीसाठी ३० वर्षे लढा देणारे तसेच 'पाणी पंचायत या संकल्पनेने सामूहिक व्यवस्थापनाद्वारे पाण्याची साठवण व वितरण करून शेतकःयांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणारे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३७ रोजी सांगली जिल्ह्यातील धूळगाव येथे झाला. त्यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यांचा १९७३ सालीचा पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील पाणलोट क्षेत्रविकास व त्याआधारे शेतीसिंचन हा प्रयोग विलक्षण गाजला व तो नायगाव पॅटर्न या नावाने ओळखला जातो.[ संदर्भ हवा ]

ते वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते.[१] त्यांना १९८६ साली प्रतिष्ठेच्या जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित केले गेले.[ संदर्भ हवा ]

त्यांचे २३ एप्रिल २००२ रोजी निधन झाले.[२]

चरित्र संपादन

  • भगीरथाचे वारस ( पाणी पंचयतीचे प्रवर्तक विलासराव साळुंखे यांचं चरित्र ) - वीणा गवाणकर २००५[३]

संदर्भ संपादन