विलासगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विलासगड
नाव विलासगड
उंची २४०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव येडेनिपाणी,वाळवा,इटकरे
डोंगररांग येडेनिपाणी
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


भौगोलिक स्थान संपादन

विलासगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा एक दुर्लक्षित किल्ला.आज तो विलासगड पेक्षा मल्लिकर्जुन देवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो

कसे जाल ? संपादन

http://www.fortsofshivrai.com/sites/default/files/u1/vilasgad.jpg Archived 2013-12-19 at the Wayback Machine.

पाहण्यासारखे संपादन

गडावर जाण्यासाठी कातळात खोदून तयार केलेल्या पायऱ्यांची वाट आहे,या वाटेने ३० मिनीटे चालल्यावर आपण मल्लिकर्जुन मंदिरापाशी येऊन पोहोचतो हे मंदिर कातळाच्या पोटातील गुहेत असून त्याच्या समोर यादवकालिन बांधणीचा छोटासा मंडप आहे या मंडपातून मूळ गुहा मंदिराच्या आत पोहोचायच्,गुहेच्या आत भीमाशंकर,उमाशंकर,सोरटीसोमनाथ,कार्तिक्स्वामी यांची वेगवेगळी गुहा दालने आहेत मल्लिकर्जुनाचे मुख्य स्थान येथील उजव्या बाजूच्या गुहा दालनात असून तेथे एक शिवलिन्ग आहे या शिवलिन्ग समोरील गुहेत वाकड्या तोन्डाचा नन्दी आहे,पार्वती देवीने थोबाडीत मारल्याने नन्दीचे तोन्ड वाकडे झाल्याचे येथील पुजारी सान्गतात.

हा मंदिर परिसर पाहुन येथुनच वर चढणाऱ्या पायवाटेने गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालू लागायच ,१० मिनिटान्ची चढाई केल्यानन्तर आपण गड्माथ्यावर येऊन पोहोचतो . गडमाथ्यावर आदिलशाही काळातील काझाकबीर चान्द्साहेब दर्गा आहे दर्ग्याला लागूनच विठ्ठ्ल रखुमाइचे व दर्ग्यासमोर श्रीक्रुष्णाचे मन्दीर आहे.

हा दर्गा परिसर पाहून येथे शेजारीच उभ्या असणाऱ्या आदिलशाही बान्धणीच्या दगडी वास्तूत पोहोचायच गडाचे गडपण शाबूत करणारी ही एकमेव वास्तू आहे,येथून समोरच एक तलाव आहे ,हा तलाव पहून गडाच्या टोकावर गेल्यावर समोर आपणास एक सपाट पठार दिसते या ठिकाणास घोडेतळ म्हणतात.पठार पाहून आल्या वाटेने मल्लिकर्जुन मन्दिरात पोहोचयच. विलासगडाची सम्पूर्ण गडफेरी करण्यास २ तास पुरतात या गडफेरीत आपल्याला कोठेही तटबन्दी व बुरुज आढळत नाहीत. गडाची संपूर्ण फेरी मारत असताना आपल्याल शिवलिंग हे आढळते . गडावर पाण्याची टाके सुद्धा आहेत . एकदम गार गार पाणी .

संदर्भ संपादन

बाहय दुवे संपादन