विमेन कॉन्टेस्टिंग कल्चर (पुस्तक)
विमेन कॉन्टेस्टिंग कल्चर : चेंजिंग फ्रेम्स ऑफ जेंडर पॉलिटिक्स इन इंडिया[१] हा लेखसंग्रह कविता पंजाबी[२] आणि पारोमिता चक्रवर्ती[३] यांनी संपादित केला असून तो 'स्त्री' कोलकत्ता यांनी २०१२ साली प्रकाशित केला आहे.
मुख्य युक्तिवाद
संपादनसदरच्या लेखसंग्रहातून संस्कृतीचे द्वंद्वात्मक स्वरूप व मुख्यत: लिंगभावात्मक आणि लिंगभाव अभिव्यक्ती यांचे द्वैतीकरण हे दैनंदिन जीवनात भौतिक आणि सौंदर्यानुभवाच्या सरावातून कशाप्रकारे स्पष्ट किंवा उघड होते यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
समर्थनीय युक्तिवाद
संपादनया साहित्यसंग्रहात संस्कृतीचे द्वंद्वात्मक स्वरूप हे एक 'स्थळ' म्हणून पाहिले गेले आहे. स्त्रियांचे शोषण तसेच स्त्रीवादी विरोध आणि परिवर्तन याला अधोरेखित करण्याचा प्रयत्न या साहित्यसंग्रहाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सदर साहित्यसंग्रहाच्या संपादकांनी सांस्कृतिक राजकारण आणि लिंगभाव, समूह, जात, वर्ग, सीमारेषा, लैंगिकता आणि विकलांगता यांचे बदलते महत्त्व आणि त्यांच्या संबंधातील भौतिक आणि प्रतिकात्मक आयाम यावर प्रकाश टाकला आहे. पितृसत्ताक विचारसरणी हे स्त्रियांच्या शिक्षणाचे त्याचप्रमाणे स्त्रीवादी संघर्ष आणि विनियोगाचे एक स्थळ बनते. समाजातील वर्ग, जात, समूह यामधील उतरंड आणि सत्तेचे गतीशास्त्र (power dynamics) संस्कृती घडवते आणि याचे स्त्रियांशी नाते हे भिन्न आणि पुष्कळदा विरोधी असते. स्त्री, संस्कृती आणि सत्ता यांच्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय चश्म्यातून या त्रिकोणी गुंतागुंतीच्या नातेसंबंधांशी संघर्ष करण्याचा प्रयत्न या साहित्यसंग्रहातून करण्यात आला आहे.
साहित्यसंग्रहाविषयी
संपादनया साहित्यसंग्रहाचे एकूण सहा भागांमध्ये विभाजन करण्यात आले असून यामध्ये विविध लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. ह्या साहित्यसंग्रहाच्या मार्फत मानवी (विशेषतः स्त्री) जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे जसे की, साहित्य, गाणी आणि गायक, नाट्यगृह आणि कलाकार, कला, लैंगिकता, नक्षलवादी स्त्रिया, तीभागा (?) चळवळ, शालेय पाठ्यपुस्तके आणि लिंगभाव इत्यादि…[४]
सांस्कृतिक अभिव्यक्ती
संपादनसदर विभागात मुख्यत: १९९० च्या अगॊदरच्या कालखंडाविषयी भाष्य आहे. यामध्ये स्त्रियांच्या इच्छा, स्त्रीवादी विद्वत्तेची सुरुवात, लोकप्रिय आणि अधिकृत न मानले गेलेले प्रकार जसे की, चित्रपट उद्योग किंवा पुनरुत्पादनाचे तंत्रज्ञान आणि वितरण, अभिजात साहित्य ज्यातून स्त्रियांना वर्जित करण्यात आले, तरीही विविध पातळीवर स्त्रियांनी पितृसत्ताक मानसिकतेला शह देउन प्रतिकाराची नवीन साधने वापरून सांस्कृतिक अभिव्यक्ती प्रकट केली.
थारू आणि ललिता दाखवून देतात की, पितृसत्ताक राष्ट्रीय समाज सुधारक, मध्यम वर्ग व वासाहतिक प्रशासनाने स्त्रियांच्या (राधिका व नागरात्मा) आवाजाबाबत मौन पाळले. आधुनिक संस्कृती व भद्रलोकांचे तत्त्व, यांच्या प्रभावामुळे दलित, ब्राह्मणेतर, लोकप्रिय आणि लोकसाहित्याचे प्रकार जे लैंगिकतेवर भर देणारे आणि विशेषतः स्त्रियांनी निर्माण केलेले होते त्याला अनधिकृत ठरवून वर्जित करण्यात आले. उदाहरणाऱ्य १९१० मध्ये राधिका साम्तावानम लिखित अभिजात साहित्य नगरात्नम्मा यांनी पुर्नप्रकाशित केले. या साहित्यात लैंगिक इच्छांचे प्रकटीकरण दिसते. परंतु १९८० पर्यत हे साहित्य दृश्य स्वरूपात पुढे आलेले दिसत नाही.
अम्लम दास गुप्ता प्रतिपादन करतात की, स्त्री गायिका ह्या वेश्या संस्कृतीच्या भाग होत्या ज्यात त्यांनी कामुक भूमिका बजावल्या, नवीन ध्वनिमुद्रण तंत्रज्ञान स्वीकारले आणि भारतीय संगीत उद्योगात प्रतिष्ठित कलाकार म्हणून समोर आल्या. बॉलीवूड चित्रपट उद्योगामध्ये स्त्री कलाकार (नादिया) म्हणून पितृसत्तेतील उद्योगाला व संकल्पनेला छेद देऊन स्वतःचे अवकाश निर्माण करते. ही स्त्री उघडपणे लैंगिक वर्तणूक करते त्याचप्रमाणे स्त्रियांना नमुना घालून देणाऱ्या स्त्रीत्वाच्या संकल्पनेला छेद देऊन सार्वजनिक क्षेत्रात पाश्चिमात्य तंत्रज्ञान व पुरुषी पोषाख परिधान करून समाजात वावरते.
प्रतिकाराच्या नवीन पद्धती म्हणून नाटक आणि विनोदबुद्धी यांच्याकडे बघण्यात आले विनोदबुद्धीबाबत भाष्य करताना स्त्रियांना नेहमी केंद्रस्थानी ठेवले जाते. विनोदबुद्धीचा उपहास करण्याऐवजी त्याला आधार देण्यासाठी स्त्रियांची गरज असते. जर विनोदबुद्धी हा स्त्रीवादी चळवळीमध्ये निषेधाचा एक भाग बनला तर त्यातून प्रतिकाराची नवीन आणि वेगळी पद्धत समोर येऊ शकते असे प्रतिपादन नबनिता देव सेन करतात. तर साबित्री द्रौपदी हा कलाविष्कार सादर करत असताना तिच्या लैंगिकतेच्या नवीन परिभाषा करून त्यावर हक्क दर्शवते. सत्तेच समीकरण स्त्री शरीराच्या भोवतीन उभ केल आहे आणि त्यावर ज्या मर्यादा आणल्या त्याला ती नाकारते. उमा चक्रवर्ती ह्या राजकीय प्रतिकार आणि सांस्कृतिक उत्पादन यामधील दुवे स्थापन करण्याचा प्रयत्न करताना साबित्रीच्या सादरीकरणाचा व मणिपुरी स्त्रियांच्या आंदोलनाचा संदर्भ घेतात.
संस्था, तत्त्व आणि स्त्रीवादी संस्कृती
संपादनहा भाग संस्था, विद्याशाखीय संरचना, औपचारिक ज्ञानाचे प्रकार, तत्त्वे, सांस्कृतिक उत्पादने आणि प्रसार यावर प्रकाश टाकतो. कला, पाठ्यपुस्तक आणि विद्याशाखा यामधील स्त्रियांची अभिव्यक्ती आणि प्रतिनिधित्व यावर भर देण्यात आला आहे. आताच्या घडीला जरी स्त्रियांचे पाठ्यपुस्तक लिखाण, प्रकाशन हे संरक्षित असले तरीही आपण (स्त्रीवादी) अवकाश, वैज्ञानिक आणि तांत्रिक संस्कृती संस्था ज्या स्त्रियांना वर्जित करतात या मागच्या कारणांचा समावेश करू नाही शकलो. त्याचप्रमाणे विकास चर्चाविश्व जे स्त्रियांना संस्कृतीविषयक संदर्भांमध्ये बघते. हे स्पष्ट होण्यासाठी पारोमिता चक्रवार्ती यांचे बंगाल मधील शालेय पाठ्यपुस्तकांसंदर्भातील काम बघितले असता लक्षात येते की, शालेय शिक्षण नवीन शक्यता निर्माण करतात पण हे एक स्थळ आहे जिथे वर्चस्व, सामाजिक - सांस्कृतिक नमुने आणि लिंगभाव उतरंडी यांना आव्हान देण्याऐवजी ती पुर्नत्पादित केली जातात. ज्ञानाचे उत्पादन हा राजकीय आणि स्त्रीवादी चळवळीमध्ये कळीचा मुद्दा होता. कशाला ज्ञान म्हणायचे, ज्ञान कोण निर्माण करू शकतो? ह्या सारख्या प्रश्नांना स्त्रीवादी पद्धतीशास्त्र आणि ज्ञानमीमांसाशास्त्र यांनी आव्हान देऊन मुख्यप्रवाही ज्ञान हे लिंगभेदावर आधारित व पुरुषकेंद्री आहे आणि स्त्रिया ह्या ज्ञान निर्मिती क्षेत्रामध्ये कर्तेपणाची भूमिका बजावतात हे अधोरेखित करून हे ज्ञान समोर आणण्यासाठी स्त्रीवादी प्रकाशन गृहांचा असलेला वाटा उर्वशी बुटालिया यांच्या कामामधून अधोरेखित होतो. तर थापी गुहा - ठाकुर्ती असे प्रतिपादन करतात की, आता जरी नवीन ज्ञान निर्माण होत असेल तरी त्याबाबत दूरदर्शी विचार आणि नीतीविषयक आणि राजकीय प्रयत्न व त्यांचा उद्देश आणि चौकशीचे मार्ग, नवीन अंतर्गत उतरंडीची निर्मिती हे लक्षात घेऊन त्यावर चिंतन करण्याची गरज आहे.
लैंगिकता आणि शरीर संस्कृती
संपादनलैंगिकता आणि शरीरसंस्कृतीमध्ये लैंगिकता आणि संस्कृती यामधील गुंतागुंतीची प्रणाली जी १९९० मधील जागतिकीकरण आणि स्त्रिया यावरील चर्चांनी स्पष्ट आणि वर्चस्ववादी बनली, यावर ह्या भागात भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लैंगिकतेच्या पर्यायी इतिहासांवरदेखील प्रकाश टाकण्यात आला आहे जसे की, भारतीय संस्कृतीचा संकरित घटक म्हणून क्युर इतिहासाचे उदाहरण देऊन समलैंगिक इच्छेच्या द्वारे ते स्पष्ट करण्यात आले आहे. लिंगाधारित शरीरांची अघळपघळ घडवणूक ही खेळ, विकलांगता आणि अश्लील चित्रण / साहित्य यांच्या संदर्भात संस्कृती, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या कक्षांचा विस्तार उघड करण्यात आला आहे. विवाहित जोडप्याचे लैंगिकीकरण हा १९९० दशकाच्या नवीन संस्कृतीचा केंद्रिय मुद्दा बनलेला दिसून येतो.
त्याचप्रमाणे मेरी जॉन अधोरेखित करतात की, लैंगिक क्षेत्रात झालेले दूरगामी बदल हे अर्थशास्त्रीय उदारीकीकरणाला पाठबळ देतात. हे आपणास लैंगिक साहित्याचा वाढता खप यातून दिसून येते. भिन्नलिंगी संस्थानिकीकरण (?) हे स्त्रियांच्या शरीरावर नियंत्रण स्थापन करण्याचे प्राथमिक स्थळ आहे. तर लैंगिक साहित्य हे हिंसक पुरूषांसाठी वैचारिक पाठिंबा देणारे साधन म्हणून बघण्यात आले. शिबाजी बंडोपाध्याय, यांनी पाश्चिमात्य अश्लील साहित्य यावर लिखाण केले आहे. बंडोपाध्याय प्रतिपादन करतात की, अश्लील साहित्याची कल्पनाशक्ती ही वर्ग, जात आणि समूह जे मानवी मनाला आकार देतात याच्यामध्ये खोलवर रुतलेली आहे. लैंगिक श्रम, समलिंगी स्त्री, पुरूष, उभयलिंगी, तृतीयपंथी ज्यांनी संरचनेला आव्हान दिले यांना मुख्य प्रवाहातून वर्जित करण्यात आले मात्र स्त्रीवादी आणि समलिंगी चळवळीनी त्यांना मान्यता देऊन त्यांना दृश्य स्वरूप दिले.
राजकीय संस्कृती आणि संस्कृतीच राजकारण
संपादनयामध्ये स्त्रियांचे कृती कार्यक्रम हे कशाप्रकारे पितृसत्तात्मक राजकीय संस्कृतीने घडलेले आहेत त्याचप्रमाणे स्त्रिया चळवळीचा भाग होऊन कशाप्रकारे स्वतःला रूपांतरित करतात हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या भागात करण्यात आला आहे. हे स्पष्ट करण्यासाठी नक्षलवादी चळवळ आणि तेलंगण चळवळी मधील स्त्रिया आणि राज्य शासनाकडून स्त्रियांवर होणारी हिंसा याबाबत विश्लेषण केलेले दिसून येते. स्त्रीवाद्यांवर जहाल तसेच सनातनी राजकीय या दोन्हीं आक्रमक पौरुषार्थ गटाकडून झालेल्या टीकेचे प्रतिनिधित्व करण्याचा पयत्न या भागात होताना दिसतो. विना दास ह्या राज्य शासन लिंगाधारित दुटप्पी भूमिका कशाप्रकारे घेते याकडे लक्ष केंद्रित करतात. तर जसोधरा बागची ह्या बंगाल फाळणीबाबत परिक्षण करतात की, पितृसत्तेने स्त्रियांवर दुहेरी नियंत्रण आणल्याचे दिसून येते. एक तर शारीरिक हल्ला (पुरूषांकडून) आणि मानसिक हल्ला (समूहाकडून). तर दुसऱ्या बाजूला फाळणीमुळे नवीन शक्यताही निर्माण झाल्या, जसे की आत्म -भानाची जाणीव त्यांना झाली. स्त्रिया विकासाबाबत बोलू लागल्या.
सैद्धांतिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन
संपादनयात सैद्धांतिक दृष्टिकोन आणि स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे दोन्ही दृष्टिकोन एकत्र करून लिंगभव आणि स्त्री अभ्यास आणि आंतरविद्याशाखीय हे एक चिकित्सक शस्त्र वापरून संस्कृतीचा अभ्यास या भागात करण्यात आला आहे. सांस्कृतिक, राजकीय विश्लेषणासाठी स्त्रीवादी सिद्धांकन उपयुक्त आहे.
ग्रंथकोषाविषयी निबंध
संपादनसदर निबंधात ग्रंथकोषाविषयी मूल्यांकन निर्णायक चळवळीचे ज्यामध्ये स्त्रियांच्या चळवळी आणि स्त्रीवादी विद्वत्ता ज्यांनी अन्वयार्थ, मूल्यमापन, संघर्ष आणि परिवर्तन, अर्थ आणि भारतातील संस्कृतीचे राजकरण समजून घेण्यास मदत केली.(वाक्याचा कर्ता, क्रियापद??)
योगदान
संपादनस्त्री साम्य बुक्स मध्ये सदर साहित्यसंग्रहाचा उल्लेख झाला आहे. त्यामध्ये संपादकांनी सदर साहित्यसंग्रहातून मानवी जीवनाचे अनेक पैलू मांडले आहेत; त्यात गाणी, पाठ्यपुस्तके, लैंगिकता, विकलांगता यांचा समावेश केलेला आहे.
संदर्भसूची
संपादन- ^ ISBN-13: 978-8190676083
- ^ http://www.jaduniv.edu.in/profile.php?uid=101
- ^ "संग्रहित प्रत". 2016-04-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-23 रोजी पाहिले.
- ^ http://stree-samyabooks.blogspot.in/2013/04/women-contesting-culture-changing.html