विद्याधर व्यास
विद्याधर व्यास (८ सप्टेंबर, इ.स. १९४४ - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक असून पलुसकर बुवांच्या उत्तर भारतीय शास्त्रीय गायन शैलीचे समकालीन प्रतिपादक आहेत. ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक असून त्यांच्यामागे संगीत महर्षी पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांसारख्या थोर कलावंतांची परंपरा आहे.
पूर्वायुष्य
संपादनविद्याधर व्यास यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. ते पं. पलुसकरांचे शिष्य पं. नारायण व्यास यांचे सुपुत्र होत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रातील स्नातकोत्तर पदवी (मास्टर्स) संपन्न केली; तसेच मुंबई येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून डॉक्टरेट मिळवली.
सांगीतिक कारकीर्द
संपादनते अखिल भारतीय आकाशवाणीचे उच्चतम श्रेणीचे कलावंत असून दूरदर्शनवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. आपल्या ध्वनिमुद्रिका, संगीत विषयक लेख व संगीत कार्यक्रमांखेरीज ते एक उत्तम अध्यापक आहेत. इ.स. १९७३ मध्ये त्यांची जयपूर येथील शासकीय संगीत महाविद्यालय (राजस्थान संगीत संस्थान) ह्या ठिकाणी मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. इ.स. १९८४ मध्ये मुंबई विद्यापीठात त्यांनी संगीत विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. इ.स. २००४ च्या फेब्रुवारीत ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या उपकुलपती पदावर रुजू झाले. इ.स. २००७ मध्ये ऑगस्ट महिन्यात त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन संस्थेच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारली. इ.स. २००७ मध्ये व्यासांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले.
ध्वनिमुद्रिका
संपादनसुनेरी मैने निर्बलके बलराम
लेखन
संपादन- 'कलर्स ऑफ द नाइट' - लेखक विद्याधर व्यास
पुरस्कार
संपादन- संगीत नाटक अकादमी पुरस्कार, २००७.