विठाबाई नारायणगावकर

(विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या पानावरून पुनर्निर्देशित)

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर (जन्म : इ.स. १९३५; मृत्यू : इ.स. २००२) ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार्‍या तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात पंढरपूर येथे झाला. विठाबाईना नृत्याची आवड होती. त्यांच्या बहिणी रमाबाई व केशरबाई यांच्या मार्गदर्शनखाली विठाबाई लावणीनृत्य करण्यात तयार झाल्या. आळतेकर, मामा वरेरकर, यांच्या कलापथकात विठाबाई प्रथम नोकरी करीत होत्या.[१]

विठाबाई नारायणगावकर
आयुष्य
जन्म इ.स. १९३५
जन्म स्थान पंढरपूर
मृत्यू इ.स. २००२
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी, हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आई शांताबाई नारायणगावकर
वडील भाऊ बापू नारायणगावकर
जोडीदार अण्णा सावंत मर्चंट
नातेवाईक रमाबाई व केशरबाई
संगीत कारकीर्द
पेशा नृत्य

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगलाताई यांचा तमाशा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील देवदहिफळ येथे आवर्जून येतात.

नाटकसंपादन करा

विठाबाईंच्या जीवनावर ओम भूतकर यांनी ‘विठा’ हे संगीत नाटक लिहिले आहे. या नाटकाच्या पहिल्या सादरीकरणाला फिरोदिया करंडक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता. झी नाट्यगौरवमध्ये सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिकही ह्या नाटकाला मिळाले होते. नाटकाचे संगीत आणि दिग्दर्शन शंतनू घुले यांचे असून व्यावसयिक रंगमंचावर हे नाटक हिंदुस्थान थिएटर कंपनी करते.

पुरस्कारसंपादन करा

  • विठाबाईंना १९५७ आणि १९९०मये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पदके मिळाली होती.
  • विठाबाईंना संगीत नाटक अकादमी्चा पुरस्कार मिळाला होता.
  • विठाबाईंची कन्या मंगला बनसोडे करवडीकर हिला भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरव प्राप्त झाला आहे. (९-१०-२०१७)
  • विठाबाईंच्या नावाने महाराष्ट्र सरकार एक जीवनगौरव पुरस्कार देते. एका वर्षी हा पुरस्कार मंगला बनसोडे यांना मिळाला होता.

संदर्भसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तृत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २३६. ISBN 978-81-7425-310-1.