विजया जहागीरदार
(विजया जहागिरदार या पानावरून पुनर्निर्देशित)
विजया जहागीरदार (जन्म : इंदूर, १२ सप्टेंबर १९३२; - सोलापूर, १ एप्रिल २०२०) या एक मराठी लेखिका व कवयित्री होत्या. बालसाहित्यकार म्हणून त्या जास्त परिचित आहेत. त्या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. सोलापूरचे २००६ साली झालेले २०वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन विजया जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.
विजया जहागीरदार | |
---|---|
जन्म |
१२ सप्टेंबर १९३२ इंदूर |
मृत्यू | १ एप्रिल २०२० |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून त्यांच्या 'ययातिकन्या माधवी' आणि 'काव्य कोडी' या पुस्तकाचे वाचन झाले होते.
मनोरंजक विज्ञान या विषयावरदेखील जहागीरदारांनी विपुल लेखन केले आहे.
विजया जहागीरदार या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या होत.
विजया जहागीरदार यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- अग्निक्षण (कथासंग्रह)
- अर्धविराम (कादंबरी)
- आकाश मोगरा (काव्यसंग्रह)
- आत्मसाक्षी (कादंबरी)
- उद्रेक (कादंबरी)
- एकदा असं झालं आणि इतर कथा (बालसाहित्य)
- कर्मयोगिनी (अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील कादंबरी)
- कल्पवृक्षाची फळे (काव्यसंग्रह)
- कालचक्र (कथासंग्रह)
- काव्य कोडी (कविता)
- केसरपक्षी (कथासंग्रह)
- खडीसाखरेचे वेल (बालकविता)
- छुम छुम गाणी (बालकविता)
- जा बै आई (बालकविता)
- गीत गीता (काव्यसंग्रह)
- गीत मेघदूत (काव्यसंग्रह)
- टाचलेलं फुलपाखरू (कादंबरी)
- टिम टिम टिकली (बालसाहित्य)
- डिंग डिंग डिगांग (बालकविता)
- तिने काय करावे? (कथासंग्रह)
- नक्षत्रांच्या प्रकाशात
- नियंती (कादंबरी)
- निर्मळ कहाण्या (बालसाहित्य)
- निवडुंगाचा मोहर (कथासंग्रह)
- फजितवाडा (बालकविता)
- फुलबाजा (बालकविता)
- बिनपानांची झाडं (कथासंग्रह).
- भिरभिरं (बालसाहित्य)
- मखमली झुला (बालकविता)
- मनगुंफा (कादंबरी)
- मोहराचं झाड (बालसाहित्य)
- ययातिकन्या माधवी (कादंबरी)
- रणयोगिनी (कादंबरी)
- रातवा (काव्यसंग्रह)
- रिंगणभूल (कादंबरी)
- वास्तु – जुई (कादंबरी)
- वेंधळी (कथासंग्रह)
- शाकुंतल (काव्यसंग्रह)
- शापित गुलमोहर (कथासंग्रह)
- सुगंध (बालसाहित्य)
- स्त्री नक्षत्र (काव्यसंग्रह)
- हिरकण्या (बालकविता)
विजया जहागीरदार यांचे झालेले गौरव आणि त्यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- २००६ सोलापूर येथील २०व्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- 'कर्मयोगिनी' या पुस्तकाला मध्यप्रदेश साहित्य अकादमीचा भा.रा. तांबे पुरस्कार.
- ‘लपाछपी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार
- ' हिरकण्या' व 'भिरभिरं' या साहित्यकृतीनाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार.