विजयाराजे शिंदे

भारतीय राजकारणी

विजयाराजे शिंदे (जन्म: ऑक्टोबर १२,इ.स. १९१९- मृत्यू: जानेवारी २५,इ.स. २००१ ) या भारतीय राजकारणी होत्या. त्या इ.स. १९५७ च्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुना लोकसभा मतदारसंघातून आणि इ.स. १९६२ च्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून, इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील भिंड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनसंघ पक्षाच्या उमेदवार म्हणून तर इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.[१]


संदर्भसंपादन करा

  1. ^ "भारतीय निवडणणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील इ.स. १९७७ पासूनच्या गुना लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकातील विजयी उमेदवारांची यादी" (इंग्रजी भाषेत).