विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आकडेवारी आणि आरंभबिंदू

Target आणि baseline

संपादन

Target=उद्दिष्ट Baseline=आरंभबिंदू ---J १९:०१, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)

J यांनी सुचवल्याप्रमाणे आकडे शेजारीशेजारी आणले. इतर माहितीसुद्धा टेबलात भरता येईल.

अभय नातू १९:१३, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)

अहाहा उत्तम! बहुतांश सदस्य येथे हौसेपोटीच काम करत असले तरी यापुढे विकिपीडियाचे काम मात्र ज्ञानकोशाच्या गांभीर्यानेच चालणार याची ही नांदी ठरावी. सॅंपल सर्व्हे झालाय आता अपेक्षांमधली रिव्हाईज्ड टार्गेटच पुढे ठेवू. या कामाबद्दल धन्यवाद. -Manoj १९:०८, १ मार्च २०११ (UTC)

अभिनंदन ... मला हे गणित आणि अनुमान एकदम योग्य आणि आटोक्यातील वाटत आहे. पण त्यासाठी आपल्याकडे नवीन लेख लिहीणाऱ्यांची आणि भर घालणाऱ्यांची संख्या वेगाने वाढायला हवी. त्यासाठी सर्वांनीच जोरात प्रयत्न करायला हवेत. पुण्यामध्ये आम्ही काही जण पुढील गोष्टी चालू करत आहोत/ केल्या आहेत. १. दर महिन्याच्या २ ऱ्या शनिवारी ६.३० वाजता नियमितपणे एकाच ठिकाणी भेटणे. २. नवीन मंडळींना मार्गदर्शन आणि मदत करणे. ३. नवीन लेखांची भर घालण्यासाठी विषय सुचवणे. ४. फेसबुक वर "विकी पुणेरी" मधून सतत संपर्कात राहून शक्य तेवढी मदत करत राहणे. ५. शाळा आणि महाविद्यालयात जाऊन माहिती पुरवणे.

मला आठवते त्याप्रमाणे मराठी विकिपीडिया चा क्रमांक काही महिन्यापूर्वी ७० च्या पुढे होता. (सर्व भाषातील एकूण लेख यादी प्रमाणे) आजच्या माहितीप्रमाणे आपण त्यात सुधारणा करून आज ६०व्या क्रमांकावर आहोत. जर आपण चांगले प्रयत्न केले तर "मराठी विकिपीडिया" पहिल्या ५० मध्ये आणू शकतो. त्यासाठी आपल्या लेखांची संख्या ५१००० च्या पुढे न्यावी लागेल. तसेच बाकीच्या भाषेत काम करणारी मंडळी तोपर्यंत शांत राहणार नाहीत हे पण लक्षात घ्यायला हवे. आपण सर्वांनी (गम्मत म्हणून का होईना ) ५१००० चे लक्ष एका विशिष्ठ कालावधीसाठी ठेऊन जोरदार प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही...... मंदार कुलकर्णी सदस्य:mvkulkarni23 २ मार्च २०११

Return to the project page "संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आकडेवारी आणि आरंभबिंदू".