विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०२२
विरोधाभासी विधाने
संपादनविकिपीडिया आशियाई महिना २०२२ मधील थीम नुसार "हिंदी सिनेमा" विषयावर लिहू शकतो पण नियम क्रमांक ८ नुसार लिहिलेला लेख मराठी भाषेत लिहिलेला असावा पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांतील विषयांवर असावा. हे विरोधाभासी विधाने वाटतात.
नक्की काय करावे? "हिंदी सिनेमा" विषयावर लिहावे कि नाही? विक्रांत कोरडे (चर्चा) २३:५९, ३ नोव्हेंबर २०२२ (IST)
@विक्रांत कोरडे:, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. "हिंदी सिनेमा" विषयावर या अभियानात लेख लिहिणे अवैध ठरेल. जर कुणी १ नोव्हेंबर ते आजपर्यंत यावर पान बनवले असेल तर ते अपवाद म्हणून मान्य करूया.-संतोष गोरे ( 💬 ) ०७:०८, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)
शिंटो मंदिर
संपादनयाच्यामध्ये नक्की कोणती माहिती आणि पान बनवायचं आहे. कारण याच्यामध्ये नाव असणारे दोन्ही पान सध्या आहेत. शिंटो मंदिर , शिंतो धर्म AShiv1212 (चर्चा) ००:०८, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @AShiv1212:, नमस्कार, कृपया लक्षात घ्यावे की या अभियानात आपण शिंतो धर्म या संकल्पनेवर लेख बनवू शकतोत. परंतु या विषयावर लेख पूर्वीचाच असल्याने परत दुसरा लेख लिहू नये. भारत वगळता आशिया खंडातील इतर देश/संस्कृती यावर आपण कोणताही लेख लिहू शकतो. इतर भाषिक विकिपीडिया वरील लेख 'आपल्या स्वतःच्या शब्दात' भाषांतरित करून येथे दिला तरी चालेल.-संतोष गोरे ( 💬 ) ०७:१८, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)