• ज्ञानकोशीय विश्वासार्हत जपण्याकरता, व्यक्तिगतमत रेटण्या पेक्षा तर्कसंगत रहाण्यास प्राधान्य द्या. तार्कीक उणीवा टाळण्याबाबत सतर्क रहा. विकिपीडियातील लेखांनी सर्व संबधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते.

पूर्वलक्षी/पूर्वप्रभावीत विश्लेषण तर्क आणि निष्कर्श

संपादन

संबधीत विषयाबद्दल आत्मीयते मुळे अथवा पुर्वग्रहांमुळे, अभिप्रेत निष्कर्श मनात आधीच ठेऊन अथवा निष्कर्ष घाई करून; इतरांची मते आपल्या मतांनी प्रभावित करण्याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उद्देशाने पूर्वलक्षी/पूर्वप्रभावीत विश्लेषण तर्क आणि निष्कर्शांची मांडणी विकिपीडीया निष्पक्षता तत्वास धरून नसते.

तार्कीक उणीवा

संपादन

अशा लेखनात बऱ्याचदा तार्कीक संगतींचा अभाव अथवा तार्कीक उणीवा असू शकतात.तार्कीक संगतींचा अभाव अथवा तार्कीक उणीवाची दखल चर्चा पानावर घ्या. चर्चा पानावर नोंदवलेल्या तार्कीक उणीवांची दखल घ्या.