विकिपीडियावर लिहिताना वार्तांकन अथवा वृत्तपत्रीयशैलीतील लेखन मुख्यत्वे वार्ताहारांच्या दृष्टीकोणामुळे झालेले प्रथम पुरूषी लेखन प्रयोग "असे मला/आम्हाला कळाले/आढळले/दिसून आले,दिसून येते/" प्रयोग टाळणे अभिप्रेत असते. शिवाय असे लेखन बऱ्याचदा नवागत संपादकांकडून ऑनलाईन वृत्तपत्र माध्यमातून जसेच्या तसे कॉपी पेस्ट झाल्यास कॉपीराईट कायद्दांचा भंग होणे संभवते.
वर्तमान अथवा भविष्यातील "काळाची गरज" स्वत: किंवा इतरांनी उल्लेखीलेली या सुद्धा ज्ञानकोशाकरीता अनुल्लेखनीय आहेत.
कृपया या लेखात/लेखनात जर वार्तांकन शैली असेल तर संदर्भासहीत पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
पत्रकारीतेतील आदर्श आणि विश्वकोशीय लेखनातील साम्यस्थळे आणि फरक
विकिपीडिया ज्ञानकोश आहे.पत्रकारीतेतील आदर्शांप्रमाणेच विकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते (पण पत्रकारीतेत या बाबींकडे मवाळपणे पाहिले जाते) .अर्थात या सर्व बाबींबाबत ज्ञानकोशातील अपेक्षेचा बार पत्रकारीतेपेक्षाही खूपच अधीक उंचीवर,अधीक कडक असतो .
पत्रकारीतेत माहितीस दुजोरा घेणे आणि खातरजमा करणे अभिप्रेत असते;पण एकतर असेकरणे संबधीत पत्रकारावर व्यक्तिश: अवलंबून असते वृत्तपत्रीय लेखनात व्यक्तिगत निरीक्षण,निष्कर्श आणि प्रथम स्रोतातील(अ-पुर्वप्रकाशित) तसेच मौखीक माहिती स्विकारता येते .ज्ञानकोशात पहिली मांडणी केली जात नाही, आधी कुठेतरी मांडणी/लेखन झाले आहे अशा मांडणीचे समसमीक्षण झाले आहे अशा माहितीचे खातरजमा करण्यायोग्य जमेल तेवढे वाक्यागणीक पुर्वप्रकाशित स्रोतातील संदर्भही द्यावे लागतात.
वृत्तपत्रीय लेखनात हातातील लेख विषयाकडे संबधीत विषयाच महत्व अधोरेखीत करण्याकरिता/लक्षवेधण्याकरिता/वाचकाच्या संवेदना/विवेक जागृतकरण्याकरिता लक्षवेधक मथळे आणि लक्षवेधी लेखन करण्यास अनुमती असू शकते पण असे करताना पत्रकाराच्या/लेखकाच्या व्यक्तिगत मताचे प्रतिबिंब येत तटस्थता, वस्तूनिष्ठता , समतोलता या मुल्यांशी तडजोड काही अंशी स्विकारली जाते.
ज्ञानकोशीय लेखकाच्या अपेक्षा भिन्न असतात.विश्वकोशीय वाचकांना भाषेचे सौंदर्य/लक्षवेधकता अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत आपण बनवतो.ज्ञानकोशाच काम सत्य जस आहे तस मांडण्याच आहे ; विवेकाची जबाबदारी ज्याची त्याची व्यक्तिगत आणि माहिती आणि समाजातील इतर घटकांची आहे , वाचकाच्या विवेकाची जबाबदारी ज्ञानकोशांची नसते.
वृत्तपत्रीय लेखन क्रम इन्व्हर्टेड पिरॅमीड (व्यस्त मेरू) पद्धतीचा असतो. सद्दघटना किंवा लक्षवेधी लेखनाने सुरवात केली जाते , विषयाची ओळख पार्श्वभूमी इतिहास या बाबी नंतर वेगळ्या क्रमाने येतात.विश्वकोशीय लेखनात विषयाची व्याख्या ओळख इतिहास शेवटी सद्द स्थिती असा क्रम येतो.