विकिपीडिया:मासिक सदर/मे २००९

मुखपृष्ठ सदर लेखCrystal Clear action bookmark.png
कालापत्थरहून दिसणारे एव्हरेस्ट शिखर

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर आहे. हिमालय पर्वतातील या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून नेपाळ व चीन (तिबेट)यांच्या सीमेवर आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.

सन १८५६ मध्ये ब्रिटीश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. या आगोदर हे शिखर पीक XV या नावाने ओळखले जात होते. १९६५ मध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने याचे अँड्रु वॉ यांच्या शिफारसीनुसार याचे नामकरण माउंट एव्हरेस्ट असे करण्यात आले.

माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंचीचे शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा या इतर शिखरांपेक्षा तुलनेने कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत. तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटीश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर ३,६७९ चढाया २,४३६ गिर्यारोहकांकडून झाल्या आहेत. पुढे वाचा...