विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१९
जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०१९
संपादन८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनांक ९ मार्चला एकदिवसीय "महिला संपादनेथॉन- २०१९" चे आयोजित करीत आहे.
महिला संपादनेथॉन- २०१४, महिला संपादनेथॉन- २०१५, महिला संपादनेथॉन- २०१६, महिला संपादनेथॉन- २०१७ आणि महिला संपादनेथॉन- २०१८ प्रमाणेच महिला संपादनेथॉन- २०१९ ला ही मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.
सर्व महिला सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..! - राहुल देशमुख ०९:२२, ९ मार्च २०१९ (IST)
कालावधी
संपादनसदर संपादनेथॉन हि '९ मार्च २०१९ एक दिवसीय (२४ तास) (तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.
उद्देश
संपादन- विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत, सर्व साधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात विकिपीडिया:महिला दालन:महिला सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. साधारणतः स्त्री अभ्यास महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.
फॅशन, ज्वेलरी खाद्यपदार्थ, इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयही चालू शकतील अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.
मराठी विकिपीडियावरील "जेंडर गॅप" वर उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथे आंतरराष्ट्रीय अभ्यास
संपादननमस्कार,
विकिपीडियावर महिलांची भागीदारी ही केवळ १० % आहे, मराठी विकिपीडियावर तर ती १ % एवढीही नाही, हे पाहून मराठी विकिपीडियावर महिलांची भागीदारी वाढावी म्हणून अनेक प्रयत्न आपण करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून साल २०१४ पासून दरवर्षी ८ मार्च, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडियावर "महिला संपादनेथॉन " आयोजित करण्यात येते. मराठी विकिपीडियावरील महिलांचे वाढते प्रमाण, मराठी विकिपीडियाने त्यासाठी केलेले प्रयत्न, महिलांच्या मराठी विकिपीडिया कडून अपेक्षा आणि संबंधित विषयाचे अभ्यास करण्यासाठी उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथील थीग यि चँग ही विद्यार्थिनी गेल्या वर्षी मुंबईस आली होती.
थीग यि चँग हि विद्यार्थिनी मूळ तैवान येथील असून ती उत्तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट स्टडीज अंतर्गत विकिपीडिया वरील लिंग भेद विषयावर प्रबंध लिहिण्यासाठी अभ्यास करते आहे. थीग यि चँग हीचा प्रबंध जवळ जवळ पूर्ण झाला असून त्यासाठी ती उत्तर अमेरिकेतून महिला संपादनेथॉन दरम्यान अभ्यास करणार आहे.
मराठी विकिपीडियाने महिलांची भागेदारी वाढवण्यासाठीच्या केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे ही एक आनंदाची बाब आहे. आशा आहे की या अभ्यासामुळे भविष्यात महिलांची मराठी विकिपीडियावरील भागीदारी अधिक वाढविण्यास मदत होईल.- राहुल देशमुख ०९:२२, ९ मार्च २०१९ (IST)
मराठी विकिपीडिया संपादनेथॉन वर विकिकॉन्फरन्स २०१८, बर्लिन जर्मनी येथे शोध निबंध
संपादन२०१८ च्या बर्लिन, जर्मनी येथे आयोजित "विकी कॉन्फरन्स" मध्ये मराठी विकिपीडियावरील महिलांच्या सहभागावर शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. ह्या मध्ये महिला आणि पुरुष विकीपीडियन्स ह्याचा जागतिक आणि मराठी विकिपीडियावरील आकडेवारीचा तौलनिक अभ्यास मांडण्यात आला आहे. मराठी विकिपीडियावर महिलाची भागेदारी वाढविण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाचा आढावा आणि त्यासाठी अमलात आणलेले धोरण ह्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. ह्या पोस्टर मुळे मराठी विकिपीडिया वरील महिला सहभागाची जागतिक पातळीवर दाखल घेण्यात आली आहे.
- अस्मिता १०:५८, ९ मार्च २०१९ (IST)
१. मराठी विकिपीडिया वरील महिलांच्या सहभागावर प्रसिद्ध झालेला शोध निबंध https://commons.wikimedia.org/wiki/Category:Wikimedia_Conference_2018_-_Learning_Day_Posters
२. विकी कॉन्फरन्स २०१८ बर्लिन, जर्मनी https://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_Conference_2018
इव्हेंट डॅशबोर्ड वर सनोंद प्रवेश करण्यासाठी सूचना
संपादनयेथे सही केलेल्या सभासदांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले विकिपीडिया सदस्यनाम आणि पासवर्ड वापरुन सनोंद प्रवेश करावा हि नम्र विनंती.
महिला संपादनेथॉन- २०१९ इव्हेंट डॅशबोर्ड
इव्हेंट डॅशबोर्ड हे विकी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याचा वापर करून 'महिला संपादनेथॉन-२०१९' चे सांख्यिकीय विश्लेषण, सदस्यांचे योगदान तसेच एकूण संपादने, नवीन लेख आणि संपादित लेख इ. चे आकलन एकत्रित रित्या पाहता येईल. - किरण राउत (चर्चा)
महिला संपादनेथॉन- २०१९ मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी येथे सही करावी
संपादन- --आर्या जोशी (चर्चा) १०:१२, ९ मार्च २०१९ (IST)
- --किरण राउत (चर्चा)
- Archanapote (चर्चा) १०:२८, ९ मार्च २०१९ (IST)
- Nikita3083 (चर्चा) १०:३२, ९ मार्च २०१९ (IST)
- Sonal90 (चर्चा) १०:३५, ९ मार्च २०१९ (IST)
- यादव मनीषा (चर्चा) १०:३७, ९ मार्च २०१९ (IST)
- --कोमल संभुदास (चर्चा) १०:४२, ९ मार्च २०१९ (IST)
- अस्मिता १०:५१, ९ मार्च २०१९ (IST)
- --जाधव प्रियांका (चर्चा) १०:५९, ९ मार्च २०१९ (IST)
- Shraddhajadhav (चर्चा) ११:१७, ९ मार्च २०१९ (IST)
- --Kselvarani (चर्चा)
- Rupali.naukarkar (चर्चा) १४:११, ९ मार्च २०१९ (IST)
- -- Sunitapote (चर्चा) १४:१२, ९ मार्च २०१९ (IST)
- -- Radha.shende (चर्चा) १४:१३, ९ मार्च २०१९ (IST)
- Savitamane (चर्चा) १४:१९, ९ मार्च २०१९ (IST)
- --यादव मनीषा (चर्चा) १४:३०, ९ मार्च २०१९ (IST)
- शितल (चर्चा) १४:३४, ९ मार्च २०१९ (IST)
- Chhaya.bhamble (चर्चा) १४:३८, ९ मार्च २०१९ (IST)
- Manasviraut (चर्चा) १४:४३, ९ मार्च २०१९ (IST)
- Minakshimane (चर्चा) १४:४७, ९ मार्च २०१९ (IST)
- Deeshakhaiwan (चर्चा) १४:५२, ९ मार्च २०१९ (IST)
- Bhargavibhagat (चर्चा) १४:५६, ९ मार्च २०१९ (IST)
- Roshniabnave (चर्चा) १५:००, ९ मार्च २०१९ (IST)
- Sanchitamane (चर्चा) १५:११, ९ मार्च २०१९ (IST)
- Dhanashree.desai (चर्चा) १५:२९, ९ मार्च २०१९ (IST)
- Komal.salve (चर्चा) १५:३३, ९ मार्च २०१९ (IST)