विकिपीडिया:मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आयोजित मराठी युनिकोड व विकिपीडिया कार्यशाळा

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, कर्वे रोड, पुणे येथे 'मराठी युनिकोड व विकिपीडिया कार्यशाळा' घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना युनिकोडद्वारे मराठी टंकलेखन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले, मराठी विकिपीडियाची ओळख करून देण्यात आली. तसेच विकिस्रोत, विकिमिडिया कॉमन्स, व विकीडाटा या बंधूप्रकल्पांची माहिती सांगण्यात आली. त्याची पाने प्रत्यक्षपणे दाखविण्यात आली.
विद्यार्थ्यांनी मराठीत टंकलेखन करावे व मराठीतील लेख, माहिती याचे वाचन करून त्यात भर घालण्याचा प्रयत्न करावा असा या कार्यशाळेचा हेतू होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद लेले, उपप्राचार्य व भाषा मंडळाच्या प्रमुख डॉ. केतकी मोडक, इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक डॉ. अर्चना जोशी इत्यादी मान्यवर या कार्यशाळेस उपस्थित होते.

आयोजक संस्था

संपादन

प्रशिक्षण मुद्दे

संपादन
  1. मराठी युनिकोड टंकलेखन
  2. Voice typing (श्रुत टंकलेखन)
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. मराठी विकिपीडियावर माहिती शोधणे
  5. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे, नवा लेख लिहिणे
  6. बंधूप्रकल्प विकिस्रोत - परिचय.
  7. बंधूप्रकल्प विकिमिडिया कॉमन्स - फोटो अपलोड करणे, स्वतः काढला असल्यास त्याचे कॉपीराईट घेणे, संदर्भ देणे.
  8. बंधूप्रकल्प विकिडाटा - परिचय.

दिनांक, स्थान व वेळ

संपादन
  • बुधवार दि. ०९ जानेवारी २०१९
  • स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
  • वेळ - सकाळी १०.३० ते दुपारी ०४

सहभागी सदस्य

संपादन

६० विद्यार्थी

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन