Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

डॉ. केतकी महेश मोडक (जन्म: १९६८) या मराठीतील लेखिका आणि मराठी भाषेच्या प्राध्यापिका आहेत.

केतकी मोडक
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा प्राध्यापिका, लेखिका
जोडीदार महेश

शिक्षणसंपादन करा

मोडक यांनी एम.ए (मराठी), एम.एड, पीएच.डी. या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी पीएच.डी.च्या प्रबंधासाठी 'मराठी संत साहित्यातील नाथप्रतिपादित सोऽहम् साधना' या विषयावर संशोधन केले. हे संशोधन करतानाच त्यांनी संत मुक्ताबाई यांच्या वाङ्‌मयावरही संशोधन करुन ग्रंथलेखन केले.

कारकीर्दसंपादन करा

मोडक या पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषेचे अध्यापन करतात. तसेच या महाविद्यालयात त्या उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्या 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी'च्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत.

श्रीअरविंद सोसायटी, पुडुचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या 'अभीप्सा' (Aspiration towards Divine) या मासिकाच्या त्या संपादिका आहेत.

लेखनसंपादन करा

इ.स. २००५ साली प्रथम प्रकाशित 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं. संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय' या संशोधन ग्रंथात संत मुक्ताबाईंच्या जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङ्‌मय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे. संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ती दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे. संत मुक्ताबाईंच्या समग्र अभंगांचा अर्थ प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेला आहे.[१] या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, पुणे नगर वाचन मंदिर, इतिहास संशोधन मंडळ, ज्ञानप्रबोधिनी (निगडी) या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Principles of Integral Education and its possible implementation in existing educational system या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाकडून मिळालेल्या अनुदानातून लघुसंशोधन प्रकल्प सादर केला आहे.

केतकी मोडक या पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या 'उपयोजित मराठी' या ग्रंथाच्या सहसंपादक आणि सहलेखिका आहेत.[२]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Kadakadoni Veej Nimali Thayinche Thayi". www.bookganga.com. 2018-04-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Upyojit Marathi". www.bookganga.com. 2018-04-25 रोजी पाहिले.