अभीप्सा (मासिक)

श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या विचारांना समर्पित मराठी मासिक
अभीप्सा मासिक मुखपृष्ठ

अभीप्सा मासिकाचा प्रारंभ

संपादन

अभीप्सा मासिकाचा प्रारंभ इ.स.१९७६ साली झाला. श्रीअरविंद सोसायटी, पाँडिचेरी तर्फे विविध नियतकालिकांचे प्रकाशन केले जाते. ऑल इंडिया मगेझिन हे सोसायटीचे मुखपत्र इंग्रजी भाषेतून प्रकाशित होते आणि त्याच्या हिंदी, कानडी, ओरिया, तमिळ इ. विविध भाषांमधून आवृत्त्या निघतात. त्याच्या मराठी आवृत्तीचे नाव 'अभीप्सा' असे आहे. यामध्ये योगी श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष आणि श्रीमाताजी ऊर्फ मीरा अल्फासा यांच्या इंग्रजी व फ्रेंच भाषेतील साहित्याचा मराठी अनुवाद प्रकाशित होत असतो.

इतर तपशील

संपादन

प्रारंभापासून इ.स. २०१७ पर्यंत हे मासिक अमरावतीमधून प्रकाशित होत असे. श्रीअरविंद सोसायटी, अमरावती शाखेतर्फे ते प्रकाशित होत असे. श्रीअरविंद सोसायटी,पाँडिचेरी यांच्याकडे त्याचा मालकी हक्क होता व आहे. भारतासह जपान, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इ.देशांमध्ये त्याचे वितरण होते.

संपादक

संपादन

प्रारंभी श्री. बल्लभ गुप्ता हे मानद संपादक, प्रकाशक व मुद्रक होते. नंतर दीर्घकाळ सौ. सरला नागराज, अमरावती यांनी संपादक म्हणून कार्यभार सांभाळला. नंतरच्या काळात श्री. वासुदेव बळवंत खापर्डे, सौ.मीरा गणोरकर, सौ.कुल्श्री मेघरे यांनी संपादक म्हणून काम सांभाळले होते. इ.स.२०१८ पासून हे मासिक श्रीअरविंद सोसायटी, पाँडिचेरी येथून प्रकाशित होते. डॉ.केतकी मोडक, पुणे ह्या या मासिकाच्या विद्यमान संपादिका आहेत.

बाह्य दुवे

संपादन