ध्यासपंथे चालता (इतिहास-ग्रंथ)

ध्यासपंथे चालता हा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा इतिहास-ग्रंथ आहे. संस्थेची स्थापना १८६० साली झाली. संस्थेच्या १६० व्या वर्षाच्या पूर्तीनिमित्त संस्थेचा हा इतिहास प्रकाशित करण्यात आला. डॉ.केतकी मोडक ह्या 'ध्यासपंथे चालता' या इतिहास-ग्रंथाच्या लेखिका आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये भारताचे उपराष्ट्रपती मा.श्री. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्ली येथे या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.[]

ध्यास पंथे चालता
लेखक डॉ. केतकी मोडक
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार इतिहास-ग्रंथ
प्रकाशन संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
प्रथमावृत्ती १९ नोव्हेंबर २०२०
मुखपृष्ठकार श्री.सुनील मैले
विषय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची १८६० ते २०२० या कालावधीतील वाटचाल
पृष्ठसंख्या ५८२
आय.एस.बी.एन. 978-81-950792-4-7

ग्रंथाची मांडणी

संपादन

या ग्रंथामध्ये एकूण ३६ प्रकरणे आहेत. त्याशिवाय कालपट, बोधचिन्हाचा इतिहास, संस्थेचे पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकाल, घटनादुरुस्तीचा इतिहास, शाखा तपशील, गव्हर्नर्स भेटींचा तपशील, राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षक अशी परिशिष्टे यास जोडण्यात आलेली आहेत.

संस्थेच्या १८६० सालापासून उपलब्ध असलेल्या सर्व कागदपत्रांचा धांडोळा घेऊन हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. लेखनास छायाचित्रांची जोड देण्यात आली आहे.

या ग्रंथास पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शुभसंदेश प्राप्त झाले आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Recount tales of bravery and social harmony from freedom struggle in school textbooks: Vice President". India Education | Latest Education News | Global Educational News | Recent Educational News (इंग्रजी भाषेत). 2022-02-08. 2024-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-03-19 रोजी पाहिले.