विकिपीडिया:भाषा व्याकरण आणि भाषाशास्त्र प्रकल्प
मराठी किंवा इतर विवीध भाषा , विवीध भाषांचे व्याकरण , आणि भाषाशास्त्र यात रूची आणि प्रेम असलेले सर्वजण या प्रकल्पात सहभागी होऊ शकतात, निदान मराठी भाषेच्या संवर्धनाच्या व्यूहात्मक दृष्टीनेहा एक अत्यावश्यक प्रकल्प आहे.
मराठी विकिपीडियावर शुद्धलेखन विषयक वेगळा प्रकल्प आहेच. पण भाषा संवर्धन आणि शिक्षणाच्या दृष्टीने केवळ शुद्धलेखन या एकाच विषयास भर देत रहाणे रहाणे पुरेसे नाही हे बहुतेक भाषाशास्त्रींनाही मान्य असते.[ संदर्भ हवा ]. मराठी व्याकरणाबद्दल शुद्धलेखनाच्या दृष्टीने पुरेसे मराठी व्याकरण विषयक लेख मराठी विकिपीडियावर आहेत. पण भाषा व्यवाहारा सोबतच ज्ञान भाषा म्हणून वापरात राहिली तरच ती टिकून रहाते. व्याकरण आणि भाशाशास्त्र वैश्विक पातळीवर खूप प्रगत झाले आहे त्याचा उपयोग विविध प्रगत देशातील लोक विविध पद्धतीने करून घेताहेत.भारतात मूठभर लोकांशिवाय इतर जना पुढे हे विषय आवश्यक त्या प्रमाणात पोहोचवले न गेल्यामुळे विविध स्तरावर या शास्त्रातील प्रगतीच्या फायद्यापासून भारतीय मुकत आहेत.
इंग्रजी विकिपीडियात भाषा भाषाशास्त्र व व्याकरण या करिता तीन वेग्वेगळे प्रकल्प आणि त्या संबधीचे लेखांना मिरवणारी वेगवेगळी दालने आहेत. पुन्हा एकदा म्राठी विकिपीडियास कमी पडणार्या संपादक बळा मुळे तीन प्रकल्प लगेच सुरू न करता तीन्हीमिळून हा एक च प्रकल्प सुरू केला आहे.कुणास वेगवेगळे प्रकल्प सुरू करावयाचे असतील तर त्याचे स्वागतच आहे.