विकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा/जुनी चर्चा

जावास्क्रीप्ट कळ-पट

संपादन

नमस्कार, मराठी विकिपीडियावर जावास्क्रिप्ट कळ-पट काही दिवसांकरिता सुरू करून त्याला प्रतिसाद कसा मिळतो हे पहावे का? असे केल्याने जर जास्त लोक लेखांमध्ये भर घालत आहेत असे वाटल्यास आपण ते सुरू ठेऊ शकतो नाहीतर ते काढू शकतो. माझ्यामते असा प्रयोग करण्यास हरकत नसावी. ----- कोल्हापुरी ०७:०९, ३ जानेवारी २००८ (UTC)

माझ्यामते तरी ही सुविधा उपयुक्त ठरेल ----- कौस्तुभ समुद्र ०७:३४, ३ जानेवारी २००८ (UTC)


हा कळपट सगळ्यांसाठी खुला न करता ज्यांना हवे आहे त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावा. यासाठी प्रणालीतील monobook.js मध्ये बदल न करता तेच बदल प्रत्येक सदस्याने आपआपल्या monobook.js मध्ये केल्यास त्या सदस्यांना हा कळपट वापरता येईल. हे कसे करायचे त्याची सविस्तर माहिती 'How to read & write in Marathi Unicode script?' या आपल्या मदतपानावर ठेवावी.

असे केल्याने ज्या सदस्यांना जावास्क्रिप्ट कळपट वापरायचा असेल त्यांना ते करता येईल तर ज्यांना नाही वापरायचा (बराहा किंवा संगणकप्रणालींतर्गत सुविधा वापरणारे सदस्य) त्यांना त्यांचे काम आहे तसेच सुरू ठेवता येईल.

या प्रस्तावाला संमती असेल तर मी या दोन्ही गोष्टी करण्यास तयार आहे (monobook.js मध्ये करायचे बदल कोणते व ते कसे करायचे याबद्दलची माहिती.

अभय नातू ०७:४४, ३ जानेवारी २००८ (UTC)

अभय,
मला असे वाटते की प्रयोग काळासाठी (१ महिन्यासाठी) आपण कळपट सर्वांसाठी खुला ठेवावा व ज्यांना तो नको आहे त्यांनी त्यांच्या monobook.js मध्ये या काळासाठी बदल करावा. जर यातून योगदान वाढले नाहीतर पुन्हा "जैसे थे" करता येईल. नवीन सदस्यांना सहजासहजी व लगेचच विकिपीडियाची चटक लागावी म्हणून असा प्रयोग करून पाहावा.
कोल्हापुरी ०८:१८, ३ जानेवारी २००८ (UTC)

या जावास्क्रिप्ट कळपटातील दोष मी आधीच नमूद केलेले आहेत व माझ्या मते त्याच्या फायदांपेक्षा जास्त आहेत. तरीही प्रयोग करायचा असेल तर हरकत नाही, तथापि याची (कळपटाची) माहिती व प्रचार करणे आवश्यक आहे.

monobook.jsमधील बदल नेमके व कॉमेंट घालून करावे म्हणजे पुढे काढावे लागले तर सोपे जाईल तसेच इतरांने ते वगळण्यासही सहज शक्य होईल.

अभय नातू ०८:५१, ३ जानेवारी २००८ (UTC)

अभय नातू म्हणतात त्याप्रमाणे सदस्याने स्वत: आपल्या monobook.js मध्ये बदल करणे योग्य राहिल असे मला वाटते. याचबरोबर ज्याप्रमाणे बाकीच्या जावास्क्रीप्टस उदा. Edit pages on double click (JavaScript) या सदस्य पसंती मध्ये enable /disable करता येतात त्या प्रकारची काही सोय ही या कळफलकासाठी करता येईल काय?
कौस्तुभ समुद्र ११:१६, ३ जानेवारी २००८ (UTC)
हा कळपट प्रायोगीक स्वरुपातच राहील. मुख्यत: तांत्रिक गोष्टी न जाणणार्‍या नवसदस्यांना योगदान करण्यास सोपे वाटावे असा त्याचा उद्देश असल्याने त्यांनी monobook.js मध्ये बदल करावेत ही अपेक्षा करणे चुकीचे होईल. सध्यातरी फक्त मराठी लिहीता येईल एवढीच सोय त्यात असेल. ------ कोल्हापुरी १३:२०, ३ जानेवारी २००८ (UTC)


अभय नातू या संदर्भात जी भूमिका घेत आहेत ती माझ्या मते अत्यंत आक्षेपार्ह आहे. आजवर त्यांनी केलेल्या कामाचा माझ्या मनात अत्यंत आदर आहे पण या विषयाबाबतीत माझे त्यांच्याशी मतभेद आहेत. त्याची कारणे अशी.
१) हिंदी, गुजराती, संस्कृत या सर्व भाषांनी ही सुविधा केव्हाच उपलब्ध करून दिली आहे. मराठी विकीपेडियन्सना यापासून का वंचित ठेवले गेले आहे?
२) यासाठी घेतलेल्या सार्वमत चाचणीत 3 जणांनी अशी चाचणी काही काळ करून पाहायला काहीच हरकत नाही असा कौल दिला आहे.
http://groups.yahoo.com/group/mr-wiki/surveys?id=1976487
एकाने विरोध केला आहे पण त्या विरोधामागचे संयुक्तिक कारण दिलेले नाही.
३) १५ डिसेंबर ०६ पासून हा विषय अनिर्णित अवस्थेत पडून आहे.
visit link
कळफलकात काही सुधारणा हवी असल्यास कोल्हापुरी व इतर सदस्य नक्कीच मदत करतील. माझ्यासारखे अनेक मराठीप्रेमी कधी घरून, कधी कार्यालयातून तर कधी सायबर केफेतून मराठी विकी पाहतात. काही सुधारणा कराव्याश्या वाटतात पण तेवढ्यापुरते बरहा वा तत्सम प्रणाली संगणकावर स्थापित करणे शक्य नसते. लहान लहान सुधारणा करू शकणारे संपादक आपण या धोरणाने गमावत आहोत. राहता राहिला प्रश्न तो काही लोक याचा गैरफायदा घेतील या भीतीचा. पण विकिपीडियाची उभारणीच सामान्य माणसावरच्या विश्वासावर झालेली आहे. अयोग्य लेखन होऊ नये यासाठी पोलादी नसल्या तरी पत्र्याच्या भिंती बांधल्या गेल्या आहेत. अभय सरांनी या बाबतीतली आपली हटवादी भूमिका सोडावी अशी मी त्यांना नम्र विनंती करीत आहे.
-- Shantanuo १४:२९, २६ जानेवारी २००८ (UTC)


मला वाटते मी (अभय नातू) या आक्षेपांना उत्तर देणे उचित ठरेल --

अभय नातू या संदर्भात जी भूमिका घेत आहेत ती माझ्या मते अत्यंत आक्षेपार्ह आहे.

आपण जुन्या चर्चा वाचल्यास माझ्या विरोधाची कारणे तेथे सापडतील. माझा याला विरोध कधीच नव्हता. माझा विरोध होता तो ही सुविधा Default असण्याबाबत. ज्यांना ही सुविधा पाहिजे त्यांना ती देण्यास मी कधीच नकार दिलेला नाही (असे मला वाटते...या चर्चेला अनेक वर्षे झाली आहेत.)

१) हिंदी, गुजराती, संस्कृत या सर्व भाषांनी ही सुविधा केव्हाच उपलब्ध करून दिली आहे. मराठी विकीपेडियन्सना यापासून का वंचित ठेवले गेले आहे?

आपले वरचे विधान विनाकारण भडक व परिस्थितीचा विपर्यास करणारे आहे. पुन्हा एकदा - जुन्या चर्चा जरुर वाचाव्यात. मराठी विकिपीडिया कोणा एकाच्या मताने चालत नाही. माझ्या कारणांना समाधानकारक प्रत्युत्तर त्यावेळी कोणी दिले नाही, त्यामुळे जैसे-थे (Status Quo) ठेवणे हेच उचित पाउल होते. जरी माझ्याव्यतिरिक्त कोणी इतर प्रबंधक असता तर त्यानेही जैसे-थे परिस्थिती ठेवली असती.

२) यासाठी घेतलेल्या सार्वमत चाचणीत 3 जणांनी अशी चाचणी काही काळ करून पाहायला काहीच हरकत नाही असा कौल दिला आहे.

वरील याहूग्रुप मराठी विकिपीडियाचे सुचालन ठरवण्याचे साधन नाही. हा ग्रुप मराठी विकिपीडियन्सपैकी अत्यल्प लोकांचा बनलेला आहे. जरी मीच तो सुरू केला असला तरी त्याच्या मर्यादा मला माहिती आहेत व तेथील निर्णय येथे लादणे हे पूर्णतया चुकीचे आहे.

३) १५ डिसेंबर ०६ पासून हा विषय अनिर्णित अवस्थेत पडून आहे.

आणी १५ डिसेंबर ०६ पासून कोणीही (काही आठवड्यांपूर्वी कोल्हापुरी व आता तुम्ही) याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. जर मराठी विकिपीडियन्सना बदल हवे असतील तर त्यासाठी सकारण आग्रह धरला पाहिजे. मी (आणि माझे सहप्रबंधक) मनकवडा नसल्यामुळे येथे न सांगता या गोष्टी मला कळणे अवघड आहे.

वरील कळफलकाला माझा (अंशतः) विरोध असूनही मी कोल्हापुरींच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे. इतकेच नव्हे तर त्याची चाचणी करण्याची offerही दिली आहे. आता वाट बघतो आहे कळफलक अधिकृतरीत्या प्रकट होण्याची. त्यानंतर काही काळापुरते हे धोरण राबवण्यात येईल हे ठरलेच आहे. जर तुम्हाला एक सदस्य म्हणून ही प्रणाली त्याआधीच हवी असेल, तर ती करून घेण्यास आपण मोकळे आहातच. याबाबतीत मदत लागल्यास मी शक्य तेवढी करेन हेही तितकेच खरे.

राहता राहिला प्रश्न तो काही लोक याचा गैरफायदा घेतील या भीतीचा

माझा विरोध गैरफायद्यापेक्षा जावास्क्रिप्ट मधील अनेक (सुरक्षेसह) त्रुटींबद्दल आहे. जर तुम्हाला या त्रुटी मान्य असतील व तुमच्या (client) संगणकावरुन तुम्हाला हे वापरणे उचित वाटत असेल तर तुम्हाला अडविणारा मी (किंवा कोणीच) कोण?

अयोग्य लेखन होऊ नये यासाठी पोलादी नसल्या तरी पत्र्याच्या भिंती बांधल्या गेल्या आहेत.

प्रबंधक या नात्याने या भिंती बांधणे हे मी माझे कर्तव्य समजतो. अश्या भिंती नसल्या तर मराठी विकिपीडिया व इतर ब्लॉग-सम संकेतस्थळांमध्ये फरक काय?

मी, इतर प्रबंधक किंवा मराठी विकिपीडियन्सनी केलेले नियम सगळ्यांनाच मान्य होतील हे शक्य नाही. पण जे काही नियम आहेत व केले जातात, ते common senseला धरुन व मराठी विकिपीडियाच्या उन्नतीसाठीच असतील असेच करणे हेच माझे काम (प्रबंधक नात्याने) आहे.

कोल्हापुरींनी किंवा इतरही कोणा सदस्याने ही प्रणाली तयार केली व ती चाचणीस उतरल्यास ही सुविधा (काही काळासाठी तरी नक्कीच) लगेचच उपलब्ध होईल याची खात्री बाळगावी.

मी खरेतर अशी स्क्रिप्ट तयार केली आहे, आणि वापरतही आहे पण यात काही तृटी मला जाणवल्या जसे की जुन्या संगणकावर टंक छापण्यासाठी लागणारा वेळ टंक बदलण्यासाठी वापरली जाणारी कळ वगैरे. सदस्य:कोल्हापुरी/monobook.js येथून जावास्क्रीप्ट वापरून तुम्ही चाचणी पाहू शकता. कळपट गमभन चा आहे. आणि रोमन लिपीतुन देवनागरी करण्यासाठी Ctrl-\ या कळांचा वापर करावा लागतो. अभय यांनी खरोखरच मला कळपटाची चाचणी करण्यासाठी मदतीचा हात दिला होता. पण मी परत काम पूर्ण करू न शकल्याने ते करता आले नाही. मी युकेशने लिहिलेल्या प्रणालीपेक्षा वेगळी आणि गतीमान प्रणाली लिहिता येईल का याचा प्रयत्न करत होतो पण दोनीही प्रणालींना जुन्या संगणकांवर वेळ लागतो. ----- कोल्हापुरी १३:३८, २७ जानेवारी २००८ (UTC)

अभय नातू ०५:२४, २७ जानेवारी २००८ (UTC)

जावास्क्रिप्ट, तटबंदी, सेतू आणि पहारे आणि आमची मुक्ताफळे

संपादन
तटबंदी, सेतू, पहारे आणि प्रबंधक
अभयजी आपण खंद्या मुत्सद्दी सेनानी प्रमाणे पहारे व्यवस्थित लावून मराठी विकिपीडियाची तटबंदी मजबूत ठेवून कोठारात अगणित लेख साठतील याची काळजी, तळ्मळ आणि अमुल्य श्रम घेत आहात . आपल्या पाऊलासोबत पाऊल ठेऊन मराठी विकिपीडियाची पाऊले पुढे पडत आहेत . मराठी विकिपीडियाची प्रगती अधिक दमदार व्हावी म्हणून दूरगामी दृष्टीकोणाची व योजनांची तसेच अशा योजना राबवण्याकरिता अधिक मराठी मावळ्यांची आपल्याला गरज आहे.या मराठी मावळ्यातील असंख्य मावळे सायबर कॅफेंच्या गढ्यांवरून आपली साथ देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या गढ्यांचे मालक ते स्वत: नसल्यामुळे मराठी फॉंटाचे शस्त्र वापरावयास न मिळण्याची नामुष्की काही वेळा आम्ही पण अनुभवली आहे, त्यामुळे शस्त्र जावा स्क्रिप्टचे द्यावे किंवा अजून दुसरे कोणते पण हाती सोपे फॉंटशस्त्र द्यावे असे माझ्यासह बर्‍याच जणांना वाटते.
मराठी इंटरनेट फॉंटाच्या रेल्वे गाडीत चढण्याच्या नावाने असंख्यांना धडकी भरते अशी मंडळी इंग्रजी भाषेचे विमान किंवा रोमन लिपीची लंगडी सवारी वापरतात. खरे तर मराठी इंटरनेट फॉंटाचा नेमका डब्बा कुठे लागतो त्यात कसे चढायचे याच्या माहिती प्रसारात आम्ही कोठे कमीतर पडत नाही आहोत या बद्दल निश्चित विचार व्हायला हवा.आधूनिक कॉलसेंटरांकडून मराठी इंटरनेट फॉंटमाहिती सेवा तसेच घरोघरी जाऊन संगणक तांत्रिक सेवा देणार्‍या अभियंत्यांनासुद्धा मराठी इंटरनेट फॉंट कसे वापरावे याची माहिती द्यावयास हवी म्हणजे किमान रोमन लिपीची लंगडी सवारी घेऊन मराठी लिवणारी मंडळी मानाने मराठीभाषेस मुजरा करू शकतील.
अर्थात मराठी इंटरनेट फॉंटाच्या रेल्वे गाडीत चढलेलेही सारेच मराठी विकिपीडियाच्या गावाला येण्यास तयार होतात असेही नाही,पाहुणे म्हणून आलेल्यांना आपण किती व्यवस्थित आणि लौकरात लौकर मदतीचा हात देतो यावर पाहूणे, पाहूणे न राहता आमचे मराठी विकिपीडियातील सवंगडी बनतील हे अवलंबून आहे तसेच अधिकाकाधिक मराठी इंटरनेट फॉंटाच्या रेल्वे गाड्यांकरिता वेगवेगळ्य ठेसनांवरून दूव्यांचे मार्ग लिंक नावाचे असंख्य सेतू बनवणे गरजेचे आहे.
कृपया आमच्या उपरोलेखित मुक्ताफळ विचारांशी प्रत्येकाने सहमत व्हावेच असे नाही.
आमची मुक्ताफळे पूर्ण किंवा अंशत: शुद्धलेखनाच्याअभावाबद्दलकुरकुरतकाहोईना (विना)मोबदला (हे कसल झेंगट?) वाचल्याबद्दल विमानात बसणार्‍यांना Thank You, khaTaaraata basalelyaaMnaa Abhaari,आणि ट्रेनेत बसलेल्यांना धन्यवाद!
आपला सहविकिकर
Mahitgar ०८:२८, २७ जानेवारी २००८ (UTC)


I feel we should have javascript but lets keep it disable by default and give a option to user to change the same by click of a checkbox.

सुभाष राऊत २०:०८, २७ जानेवारी २००८ (UTC)

माहितगार,
मुद्दा व्यक्तिगत न करता त्याचे समर्थन करणारे आपले लिखाण वाचून मजा वाटला (वाटली?). फॉँटशस्त्र देण्यास आमची ना नाही. भंडार खुले आहे, पण आमच्या मावळ्यांच्या हातात गावठी कट्टा (जो त्यांच्याच अंगावर उलटी गोळी झाडू शकतो) देण्यापेक्षा एखादी ए.के.४७ द्यावी अशी आमची इच्छा आहे. अगदी ग्लॉक किंवा स्मिथ अँड वेसन जरी सापडली तरी ती आम्ही देऊ करू.
अर्थात, देऊ म्हणताना आम्हीच शस्त्रागाराचे मालक असल्याचे आव आणत असलो तरी आम्ही फक्त या किल्ल्याचे किल्लेदार आहोत. बृह्नमहाराष्ट्ररूपी रायगडावर बसलेली मायबाप जनताच आमचा बोलविता धनी आहे.
अभय नातू २२:३८, २७ जानेवारी २००८ (UTC)

अभय नातू म्हणतात त्याप्रमाणे आपले कोल्हापुरचे सदस्य कोल्हापुरी यांनी स्वतः फॉँटशस्त्राचा कारखाना काढलेला आहे. मी स्वतः त्यांच्या monobook.js मधून स्क्रीप्ट ढापून माझ्या Monobook.jsमध्ये फॉँटशस्त्र तयार केलेले आहे. मी स्वतः AMD Athlon Dual processor CPU वापरतो. व मला हे फॉँटशस्त्र फारच उपयुक्त वाटते आहे. तरीसुद्धा उद्या नेट कॅफे मध्ये जाउन खात्री करून घेईन. फक्त कृपया अभय नातू सरांनी हे शस्त्र उलटी गोळी कशी मारु शकते हे आम्हां नव'जवानांना' समजवावे. कळावे, आपला (नवीन शस्त्रधारी) कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:२३, २८ जानेवारी २००८ (UTC)

हे शस्त्र उलटी गोळी कशी मारु शकते हे समजवावे

  • Javascript is inherently prone to security hacks. These can affect client computers.
  • The existing version of the keyboard is not complete and is error-prone. Unless we can come up with one that's reasonably accurate and moderately fast, the advantages are not many.
  • Javascript is very slow. We already use javascript. It contributes to wikipedia being slow, especially on older computers with older OS and/or older versions of browsers. Adding more to monobook.js will slow it down further, even to the point where it's unbearable on moderately new computers.
  • If, instead of adding the added code to 'default' javascript, the code is added by each user to his/her monobook.js file, several advantages are achieved --
  • The user makes a conscious decision to add more javascript.
  • Users that have a slower/older computer are shielded from the ill effects.
  • Since the choice is at user level (as against computer level), you can access Marathi Wikipedia site from anywhere in the world and your experience will not change. Those users that installed the extra code will get to use it (as long as they log in) and those that did not will not be forced to use it.
  • Users (like me) can even establish two user id's, one with the javascript keyboard enabled and another without. This will allow them to have the best of both worlds.

By installing the utility as default, we negate all of the above.

This is/has been my reasoning behind resisting default phonetic keyboard javascript on the site, while allowing the more technically savvy among us to use it with simple addition of javascript code to their own user-experience.

Abhay Natu २२:४९, २८ जानेवारी २००८ (UTC)

p.s. Ironically, I myself do not have access to Baraha and/or Windows native Marathi keyboard for part of the day, so I'm forced to type in English using a different id from the one I use normally.


अभय नातू यांनी सूचित केल्याप्रमाणे खरोखर जावास्क्रीप्ट अतिशय हळू आहे. काल माझ्या एकंदर एक तासातील जवळजवळ निम्मा वेळ हा अलीकडील बदल पान load होण्यातच गेला. मी आता "न धरी शस्त्र करी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" असाच निर्णय घेतला आहे. अभय नातू यांना धन्यवाद. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:३८, ३१ जानेवारी २००८ (UTC)

Omkar Joshi:

I had been following this issue on wiki for a long and I am still unware what stops wiki to use IME for marathi.

I had proposed earlier to integrate gamabhana (http://www.var-x.com/gamabhana) but I did not see any positive response for the same. At the same time it was tailored for nepali langiage on wiki and its in use for a long time by now.

Those who are not aware about gamabhana can visit http://www.var-x.com/gamabhana/ and read about technical details at http://www.var-x.com/gamabhana/developers_corner/

I consider following features for any IME which is based on javascript :

  1. Provide phonetic typing/editing features.
  2. Can work with native softwares like baraha.
  3. Offers unicode support.
  4. Cross browser compatibility.
  5. javascript files less in size.
  6. Add on plugins such as auto complete, auto correct, auto sugegst, spell check etc.

Considering gamabhana, it addresses all above issues very well. It provides phonetic typing i.e. it does not adhere to specific font/keyboard layout. it works smoothly with baraha or Indic IME . It allows baraha to override editing if both gamabhana and baraha are ON. unicode support is provided. it works fine in IE and FireFox. javascript files are compressed and moreover they are customizable ( with uncompressed source code). The best of all is that gamabhana is open source and free.

Technically a single javascript function call enables gamabhana to provide phonetics for any type of editable DOM object. You can find several druapl based marathi sites using gamabhana. Recently a plugin is launched for wordpress which used gamabhana at backend.

I am not sure why are we discussing on the secuirty threats of javascript. There are several disadvantages of javascript which you can find on wikipedia itself, which in fact are limitations of technology and not the products/solutions developed using the technology.

About the only point that was left out unaddressed on gamabhan in earlier discussions with Mr. Abhay Natu, was not making any solution as default. With new version of gamabhana you can work smoothly even if you use your system based IME or web based IME wiz gamabhana.

At best, any solution wiki goes with , user acceptance is the major factor. I wish this issue gets resolved at best and I am ready to assist for technical matters in that case.

Note: For me; images in Wiki take more time than javascripts if you consider bandwidth and speed.

Best Regards, Omkar joshi

Hello Mr. Joshi,
Thanks for chiming in to the debate.
One of the reasons your suggestion was not implemented was that Mediawiki was not ready for third party plug-ins. I'm still not sure how it will integrate, but I'm sure that you will help us understand it.
But the biggest reason was that Marathi Wikipedia was severly short-staffed (as it is even today) and providing a tool such as yours was not the pressing priority at that time. Now that we have more people contributing, perhaps it is time to reconsider it.
Technically a single javascript function call enables gamabhana to provide phonetics for any type of editable DOM object
This suggests that GaMaBhaNa is some kind of third party plug-in or service that allows transcription. It would be best if Wikipedia can implement such a tool without depending on a third-party server/site or software of any kind. Even the admins here do not have rights to install plug-ins or extra software on mediawiki servers. A (web) service based transcription tool has its own issues (from security to performance and reliability, but that's another discussion.)
I am not sure why are we discussing on the secuirty threats of javascript. There are several disadvantages of javascript which you can find on wikipedia itself, which in fact are limitations of technology and not the products/solutions developed using the technology.
Precisely my point. Javascript inherently has those flaws and that is why I resist using it. No one is knocking your software or any other tool written in Javascript. Javascript has its uses, but transcribing fonts is not one of them (yet.)
For me; images in Wiki take more time than javascripts if you consider bandwidth and speed.
Images are loaded once per page and even if they do not load (shown as red x in its place) user's experience is not degraded much. With an extremely slow transcription tool, every key-stroke is a pain, over and over. Also, with a fast connection, image problem is overcome easily. I'm concerned about users with older/slower computers(such as those in net cafes, etc), for whom the slowness of a transcription tool is magnified exponentially.
I have not yet read through your updated documentation. I shall do so shortly. Remain assured that my opinion of it is not steadfast or hard-nosed. If I see even moderate value in using it, I shall be the first one to request you to help.
I thank you on behalf of every Marathi wikipedian for your offer to help.
Regards,
Abhay Natu २२:२९, ३१ जानेवारी २००८ (UTC)


New transiliration tool

संपादन

The new transiliration tool is ready for Devanagari. Anyone can test it on pi wiki. Remember some points using it:

  • See at the top right of the edit box, there would be a box containing अ, click it to turn on or off the transiliration.
  • Type the word in roman characters, an then press space for converting it to Devanagari. If there is a trouble in the conversion, press backspace before the word, and different options will come which are near to the current word. If you do not find your word, there is a problem in the input given.

I will soon contact mr wiki admins regarding this new tool, I request everybody to test it on pi wiki. If there is any feedback, please post it here.Vibhijain १५:०७, १६ जून २०११ (UTC)

Dear Vibhi I tried it on pi wiki concept of online dictionary support while typing is just wonderful Yes Marathi Wikipedia admins really need to take note of it माहितगार १६:००, १८ जून २०११ (UTC)
Yes, it works
But why to use this tool when one can directly type in roman script and see the result in Devanagari, even if no transliteration tool is available?...J १६:१३, १७ जून २०११ (UTC)
जे साहेब पाली भाषा विकिपीडियात वापरले जाणारे हे साधन मराठी विकिपीडिया प्रमाणेच काम करते जास्तीची सोय अशी की लिहून झालेल्या शब्दावर टिचकी मारली असता तुम्हाला पर्यायी शब्द दिसतात. म्हणजे तुमच्या विकिपीडियावर अशुद्ध लेखन झालेले शब्द काढून टाकलेना तर नंतर टायपींग करणार्‍यांना शुद्ध शब्द माहित नसेल तरी शुद्ध शब्द पर्याय अधीक सहज माहिती होऊ शकतील. सुविधा मस्तच म्हणावयास हवी.माहितगार १६:००, १८ जून २०११ (UTC)

.

  • विभि, खरोखर चांगली सुविधा आहे. मराठी विपीवर पण हि सुविधा लवकरात लवकर उपलब्ध झाली तर टायपो च्या धाकाने दूर राहिलेली मंडळी पण लवकरच आपलीशी होईल.
(On screen interactive keyboard facility to edit words in devnagri is an icing on the cake. )
धन्यवाद
राहुल देशमुख १६:४५, १८ जून २०११ (UTC)
Today I am feeling that I should learn Marathi, so I can participate in discussions here. If much Marathi wiki users like this tool, I will soon provide this transiliration tool's script. Any feedback would be a lot appreciated. If anyone wants to test this tool on Marathi wiki, copy all content from this, and paste it on your personal script file. Vibhijain १०:०६, १९ जून २०११ (UTC)
Umm.. I found it quite clumsy for users wnho are already comfortable writing with existing transliteration tool available on Marathi Wikipedia. The annoying part is that you have to wait for the transliterated output (i.e. Devenagari string) to appear after you have keyed in the entire latin character string. This would be rather a repulsive user experience for most of the people using Devenegari transliteration tools of some form - most of which behave in WYSIWIG way.
I would wish to see improvements in the tool in this aspect, before considering it for deployment on any of the Devenagari Wiki projects.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३५, १९ जून २०११ (UTC)
  • I think we should give a selection switch (like check box or radio button) to select the tool and let people select whatever they like. As similar kind of tools are common on so many other sites there is a class of users who are use to with this and yes as it works like Marathi spell checker the work of moderators will be simpler.
राहुल देशमुख १८:३३, १९ जून २०११ (UTC)
Since discussion is going on this subject,I would like to draw attention to transiliration tool improvement discussion at विकिपीडिया:कौल#मराठी विकिपीडियामधील सध्याच्या मराठी लेखन प्रणालीची विस्तारीत अंमलबजावणी प्रस्ताव; Please some one volunteer to translate that in to english for non-marathi developers sake and pl also some one volunteer to start putting up requests at bugzila wherever apropriate and necessary.माहितगार २३:३७, १९ जून २०११ (UTC)
  • Many people will write positive and negative things, I'm sure. I hope that this is studied in business schools going forward and analyzed in many ways. And we'll look back and try to understand what the results were compared to what we expected. And I think that's a very healthy process.
Steve Crocker, ICANN Board Member, in his remarks during the board session on New Top-Level Domains Approval said: "Having been involved in a series of key decisions along way from the very beginning, I fully understand that trying to do it exactly right and particularly trying to hold things up to get things exactly right, is exactly the wrong thing to do."
राहुल देशमुख ०७:४२, २० जून २०११ (UTC)
Its true that this tool sometimes work slow on slow internet connections. I have a different script for marathi here, add it on your personal script file. It has some changes. I am trying to add another virtual keyboard, which will be like editing with your own keyboard. Please wait for it. We can make this tool as a optional gadget as having a check box for it is tough. This tool has been added as a gadget on hindi wiki already. Vibhijain ०९:४०, २० जून २०११ (UTC)

मनोगतावरील शुद्धलेखन चिकित्सक

संपादन

..विकिपीडियावर अशुद्ध लेखन झालेले शब्द काढून टाकलेना तर नंतर टायपींग करणार्‍यांना शुद्ध शब्द माहित नसेल तरी शुद्ध शब्द पर्याय अधीक सहज माहिती होऊ शकतील...माहितगार १८ जून २०११.

मनोगतावर आज गेले काही वर्षे शुद्धलेखन चिकित्सक काम करतो आहे. चुकीचा शब्द टंकलेखित होतच नाही, तो छापताछापताच दुरुस्त होतो. तिथे मुद्दाम अशुद्धलेखन करण्यासाठी किंवा मराठीखेरीज अन्य भाषेत लिहिण्यासाठी, आधी त्यांचा शुद्धिचिकित्सक बंद करावा लागतो. त्यामुळे त्या संकेतस्थळावर मराठी लिहिताना र्‍हस्वदीर्घाची चूक होतच नाही. (व्याकरणाच्या चुका मात्र होऊ शकतात !) आज अनेकजण आपले लिखाण इतरत्र छापण्याअगोदर मनोगतावर टंकित करतात आणि दुरुस्त झाले की हवे तिथे उचलून नेतात. मनोगतावर लिहिताना शुद्ध शब्द माहीत असायची गरज पडत नाही.

आपण इथे जो ट्रान्स्लिटरेटर आणायचा विचार करीत आहोत, तो फक्त लिपीबदल करू शकेल, शब्ददुरुस्ती नाही. त्याअधिक, तो मूळ शब्दासारखे दिसणारे काही पर्यायी शब्द सुचवू शकेल. असे पर्यायी शब्द सुचवणारे ट्रान्सलिटरेटर गूगल, महाराष्ट्र टाइम्स आणि मनसेसारख्या काही राजकीय पक्षांच्या संकेतस्थळांवर आहेत. ते कसे काम करतात याचाही अनुभव घेऊन पहावा.

याशिवाय इतर अनेक जणांनी मराठीसाठी शुद्धलेखन दुरुस्त करणार्‍या प्रणाल्या शोधून काढल्या आहेत. त्या थोड्याफार बर्‍यापकी चालतात. ...J ०९:५७, २० जून २०११ (UTC)


इतर प्रर्याय

संपादन
  • ह्या संकेतस्थळावर मराठी लिहिताना र्‍हस्वदीर्घाची चूक होतच नाही तसेच मूळ शब्दासारखे दिसणारे काही पर्यायी शब्द पण सुचवतो तसेच इंग्रजी ते मराठी शब्दकोश पण उपलब्ध आहेत. ह्या संकेतस्थळावर केवळ मराठीच नाही तर इतरही अनेक भारतीय भाषांसाठी सेवा उपलब्ध आहेत.
राहुल देशमुख ०६:२७, २१ जून २०११ (UTC)

तमिळक्यूब

संपादन

संकेतस्थळ उघडून पाहि्ले. शुद्धलेखनाच्या बर्‍याच चुका आपोआप दुरुस्त झाल्या, मात्र एखादी रहाते. मूळ शब्दासारखे दिसणारे पर्यायी शब्द मात्र दिसले नाहीत. त्यासाठी काय करायचे? सर्व भाषांतील दहाबारा शब्दकोश उतरवून घ्यायला पाहिजेत? त्यांचे एकूण आकारमान किती असेल? ही माहिती शोधता आली नाही. माझ्या संगणकावरील स्पाय बस्टर, कोश उतरवून घेऊ नका असा सल्ला देतो आहे. फक्त मराठीचा कोश उतरवून घेता येईल अशी सोय दिसत नाही....J १४:३२, २३ जून २०११ (UTC)


  • नमस्कार J ,
आपणास पर्यायी शब्दासाठी ब्याकस्पेस वापर करावा लागेल. ज्याप्रमाणे आपण लिहिलेले शब्द खोडण्यासाठी ब्याकस्पेस (विरुद्ध कळ) वापरतो त्याच प्रमाणे वापरा पर्याय दिसतात. शब्द कोशासाठी तमिळ घन च्या लोकांशी बोलता येईल.
धन्यवाद
राहुल देशमुख १४:५१, २३ जून २०११ (UTC)

विक्निक

संपादन

en:Wikipedia:Wiknic

अभय नातू १३:४०, २३ जून २०११ (UTC)

धन्यवाद

संपादन

राहुल देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे केल्यावर पर्याय दिसले. पर्याय जेमतेम पाच-सहाच असावेत, पण ते बहुतेक पर्याय अर्थहीन किंवा सदोष होते.

शब्दकोश उतरवून न घेता इंग्रजी शब्दासाठी मराठी अर्थ बघण्याची सोय तमिळक्यूबवर सापडली. दिलेल्या अर्थांतले काही असंबद्ध आहेत. उदा० Silence च्या अनेक अर्थांत ‘गावगुंड’ हा एक अर्थ दिला आहे. संस्कृतमध्येतर Silence साठी मूकता, मूकिमा, अनालाप, स्तिमितत्त्व, शांति, शांतता, निःशब्दता, निष्कल्लोळ वगैरे वगैरे अनेक शब्द आहेत. या तमिळघनच्या संस्कृत कोशात एकच मौन हा शब्द अनेकदा फिरवून फिरवून दिला आहे. त्या मानाने इंग्रजीतून इंग्रजी हा कोश बरा आहे. त्यात Silence शब्दाचे वाक्यांत उपयोग करून अनेक अर्थ सांगितले आहेत. एकंदरीत संकेतस्थळ मनोरंजक आणि थोडेफार उपयुक्तही आहे. विकिपीडियाच्या अन्य मंडळींनी, विशेषत: विभिजैन यांनी तमिळक्यूबला जरूर भेट द्यावी. .....J १८:०९, २३ जून २०११ (UTC)