पंडित डॉ. विकास कशाळकर (१६ जुलै, १९५० - ) हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक आणि गुरू आहेत.

कशाळकरांचे वडील ॲडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. गायक अरुण कशाळकर व गायक पं. उल्हास कशाळकर हे विकास कशाळकरांचे सख्खे बंधू आहेत.

विकास कशाळकर यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीनही घराण्यांच्या गायकीचे शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर पद्धतीच्या संगीताचे शिक्षण त्यांनी व्हायोलिन वादक आणि गायक पंडित गजानराव जोशी यांच्याकडून गुरू-शिष्य पद्धतीने घेतले.

सांगीतिक कारकीर्द संपादन

कशाळकर हे पुण्याच्या बालभारतीत कार्यक्रम निर्माते होते. तिथून निवृत्त झाल्यावर त्यांनी संगीत शिकवायला प्रारंभ केला. ते भारतभर आणि परदेशांतही गाण्याचे कार्यक्रम करतात. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांचे कंठ्यसंगीताचे कार्यक्रम नेमाने होतात.

ललित कला केंद्र व पुणे विद्यापीठातील विकास कशाळकर हे ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकवतात. एस.एन.डी.टी. विद्यापीठातील आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ते पी‍एच.डीचे मार्गदर्शक आहेत.

शिष्य संपादन

पुरस्कार संपादन

  • गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही मानद उपाधी
  • ज्ञानेश्वर माउली लिम्हण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गुरुमाउली पुरस्कार
  • गानवर्धन संस्था आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार


(अपूर्ण)