वासुदेव नरहर सरदेसाई
वासुदेव नरहर सरदेसाई (जन्म: कान्हे(चिपळूण-रत्नागिरी, ६ मार्च १९३७) हे एक मराठी गझलकार आहेत. गुजरात विद्यापीठातून त्यांनी एफ.वाय.बी.एची परीक्षा इ.स.१९५७ साली दिली आणि शिक्षण सोडले.
वा.न. सरदेसाई यांनी कविता आणि गझलांशिवाय काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांच्या कविता आणि गझला अनेक मराठी नियतकालिकांतून, विशेषांकांतून आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.
वा.न. सरदेसाई हे आकाशवाणीचे मान्याताप्राप्त कवी आणि नाट्य-अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम झाले आहेत.
अमरावती, औरंगाबाद, नासिक आणि मुंबई या थहरांत झालेल्या मराठी गझल संमेलनांत सरदेसाईंचा सहभाग होता
वा.न. सरदेसाई यांनी हाताळलेले काव्यप्रकार
संपादनसरदेसाई यांनी अध्यात्मगीत, अंगाईगीत, अभंग, ओवी, कतआ(मुक्तक), गझल, ग्रामीण गीत, दोहा, बालगीत, भक्तिगीत, भावगीत, रुबाई, लावणी, लोकगीत आणि हायकू यांसारख्या अनेक प्रकारांच्या कविता लिहिल्या आहेत.
वा.न. सरदेसाई यांची पुस्तके
संपादन- अंगाई ते गझल-रुबाई (समग्र वा. न. सरदेसाई)
- आणि ‘माती गाते गीत आपुले (अप्रकाशित नाटक)
- आम्ही हरलोय, पृथ्वी जिंकलीय (नाट्यदर्पणचा प्रथम पुरस्कार मिळालेले आणि रंगभूमीवर आणि दूरचित्रवाणीवर प्रयोग झालेले बालनाट्य)
- को जागर्ति? (रंगभूमीवर आणि दूरचित्रवाणीवर प्रयोग झालेले बालनाट्य)
- त्याची वंदावी पाउले (महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत जळगाव केंद्रावर सादर केलेले बक्षीसपात्र नाटक; १९७१)
- माता न तू वैरिणी (रंगभूमीवर आलेले पण अप्रकाशित नाटक)
- माझी कविता (कवितासंग्रह; प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति-मंडळ; १९८४)
- आभाळपंख (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन;२००१)
- चांदण्यांची तोरणे (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन; २००३)
- शू~~! शूटिंग चालू आहे (रंगमंचावर सादर झालेले अप्रकाशित नाटक)
पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान
संपादन- अक्षर नियतकालिकाच्या १९८६ च्या दिवाळी अंकात एक गझल प्रकाशित. तीनशे दिवाळी अंकांतील निवडक तेरा कवितांमध्ये त्या गझलेचा समावेश.
- ’आचार्य अत्रे स्मृति कथा-कविता स्पर्धा – नवयुग १९७०’ ह्या खुल्या स्पर्धेत सुमारे पंधराशे कवितामधून ‘ इंगित‘ ह्या कवितेला प्रथम पारितोषिक/ लघुकथेलाही पुरस्कार.
- वसईहून प्रसिद्ध होणाऱ्या सुवार्ता मासिकाच्या १९८५ च्या विशेषांकासाठी घेतलेल्या काव्यलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
- ’आम्ही पार्लेकर’च्या २००७ आणि २०१२ सालच्या दिवाळी-अंकात कविता-लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक.