वाळुतझिरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?वाळुतझिरा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सुरगाणा
जिल्हा नाशिक जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा डांगी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

सुरगाणा पासून 12 कि.मी अंतरावर गाव आहे. ह्या गावाजवळ तान नदी उगम पावली आहे व पुढे ती गुजरात मधुन अरबी समुद्राला जाऊन मिळते.

हवामान

संपादन

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन

संपादन

वाळूटझिरा हे गाव सुरगाणा तालुक्यातील भवानदगड ग्रामपंचायतीमधील पाचशे लोकवस्ती असलेले ह्या गावामध्ये कोकणा, वारली, महादेव कोळी ह्या आदिवासी जमातीचे लोक राहतात. वाळूटझिरा गावांचे एकूण तीन पाडे आहेत.त्यामध्ये तिवशेमाळ ,हेदिचापाडा, व वाळूटझिरा असे पाडे आहेत. वाळूटझिरा गावाच्या पूर्वेला अगदि रस्त्याच्या कडेला लागूनच शिव मंदिर आहे .व मंदिराच्या पूर्वेला 200 मी.अंतरावर आदिवासी निसर्ग देवता वाघदेव नागदेव आहे .याची पुजा दरवर्षी वाघबारस या दिवशी केली जाते . गावाच्या पूर्वेला व उत्तर दक्षिण बाजुला उंचच उंच डोंगर पसरलेला आहे व पश्चिमेला घनदाट जंगल आहे.जंगलामध्ये वाघ, तरस,माकड,खार ,रानमांजर ,ससा,मुंगुस ,सियार,इ.जंगली प्राणी आढळून येतात.तसेच नाग ,घोणस ,परड,विंचू,इ.सरपटणारे प्राणी आढळून येतात. येथील लग्न आदिवासी पंरपरेनुसार होतात.तसेच डोंगरमाऊली (भाया),हा गावित परिवातील उत्सव मोठ्या आनंदाने दर दहा वर्षानी साजरा केला जातो.तसेच तेरा,नागपंचमी (पचवी) ,पीत्री,मकर संक्रांत ,दिपावली,बैलपोळा ,होळी ,अक्षय तृतीया (अखाती) वाघबारस हे सण साजरा केले जातात.

      गावामध्ये 1ली ते 4 थी पर्यंत शाळा आहे.पुढील शिक्षणासाठी तालुकाच्या ठीकाणी जावे लागते.बरेसे विद्यार्थी हे आश्रम शाळेत शिक्षण घेतात.वाळूटझिरा गाव हे 100% आदिवासी गाव आहे.वाळूटझिरा गावाच्या पश्चिमेला 1 कि.मी.अंतरावर व तीवशेमाळच्या पूर्वेला 200 मी अंतरावर वाळूटझिरा नावाचे एक छोटेसे तलाव आहे.या तलावावरून गावांचे नाव वाळूटझिरा हे पडले.
      1990 पूर्वी ह्या गावाजवळून सकाळी व संध्याकाळी फक्त एक बस सुरगाणा येथे जात होती .याच्या व्यतिरिक्त वाहतुकीचे एकही साधन नव्हते. सर्व लोक पायी प्रवास करीत होते.या गावाच्या 2 कि.मी.अंतरावर गुजरात मधील डांग जिल्ह्याची हद्द असल्याने गुजरात मधील बोली भाषेचा प्रभाव पडलेला आहे .95% लोक हे डांगी भाषा बोलणारे आहेत.येथील पावरी नृत्य,ठाकर्या नृत्य,तुर,काहळया आदिवासी नृत्य,मादोळ आदिवासी नृत्य, हे नृत्य प्रकार आढळून येतात.येथील तीनही पाडयाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate