वारूगड
वारूगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
वारूगड | |
नाव | वारूगड |
उंची | ३००० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | सातारा, महाराष्ट्र |
जवळचे गाव | वारुगड माची (गिरवी)फलटण |
डोंगररांग | फलटण सातारा |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
महत्त्व
संपादनविजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारूगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे.
भौगोलिक स्थान
संपादनसातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव रांग धावते. या पूर्व-पश्चिम धावणाऱ्या रांगेतच ठाण मांडून वारूगड आपली मान उंचावून बसलेला आहे. फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने ही रांग जाते.
कसे जाल ?
संपादनवारूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. एक मार्ग फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असा आहे. एक मार्ग दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड असाही आहे. हे दोन्ही अतिशय कच्चे आहेत. वारूगडाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे फलटण-गिरवी-चव्हाणवाडी असा आहे. या मार्गावर एस.टी.ची सोयही आहे. अन्यथा गिरवी पर्यंत येऊन तेथून चार कि.मी. चालत वारूगडाचा पायथा गाठता येतो.
पाहण्यासारखे
संपादन१) बालेकिल्ला
२) भैरवनाथ मंदिर
३) गोमुखी प्रवेशद्वार
४) गोड्या पाण्याची टाकी
५) पश्चिम टाकी
६) तलाव
गोमुखी बांधणीच्या दरवाजाच्या कमानी पडलेल्या असून बाहेरील बुरूज मात्र शाबूत आहेत. या माचीच्या पूर्वेकडील कड्याला सलग तटबंदी बांधून हा भाग संरक्षित केलेला आहे. या माचीच्या वरच्या भागात वारूगडाचा छोटासा पण आकर्षक दिसणारा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|तट]]बंदीपासून खालच्या महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|माचीपर्यंत]] एक भिंत बांधून काढलेली आहे. या भिंतीमुळे किल्ल्याचे दोन भाग झाले आहेत.
भिंतीच्या पलीकडे उंच झाडांमध्ये पाण्याचे टाके आहे. हे महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|टाके]] नव्यानेच उत्तमपैकी बांधून काढले असून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. याच्या पलीकडे छोटेसे मंदिर आहे. मंदिरामध्ये तांदळा असून दारात नंदी, नागराज इत्यादी शिल्पे पडलेली आहेत.
बालेकिल्ल्यावरून जी भिंत खालपर्यंत बांधलेली आहे, ती ही जमीनदोस्त होत चालली आहे. त्या भिंतीवरूनच एक पायवाट बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रुळलेली आहे.तटाच्या खाली नष्ट झालेला दरवाजा आहे. दोन्ही बुरूजांना तडे गेलेले आहेत. अतिशय छोटासा परिसर माथ्यावर आहे. चारही बाजुला कडे आहे. माथ्यावर जुन्या मंदिराचे अवशेष, काळकोठडी आहे व खोल अशी पाणी नसलेली विहीर आहे. एक मोठ्या आकारचे धान्य दळायचे दगडी 'जाते'ही पडलेले आहे. तटबंदीमध्ये एक शौचकूपही आहे. माथ्यावरून ताथवडा किल्ला दिसतो. स्वच्छ वातावरण असल्यास येथून पुरंदर आणि वज्रगड ही किल्ल्याची जोडगोळीही दिसते. महादेव रांगेतील शिखर शिंगणापूरचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. लोणंद-बारामती-फलटण ते नातेपुते इतका विस्तृत प्रदेश दिसतो. खालच्या माचीच्या पूर्व भागात आता नव्याने जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. अतिशय कलात्मक दृष्टी ठेवून मंदिराचे रंगकाम केले आहे. हे भैरवनाथाचे मंदिर असून भेट देण्यास परिसरामधून भाविक येत असतात.
पश्चिमेकडील बाजूस एक जुनी टाकी आहे . या टाकीला नव्यानेच सिमेंट मध्ये बांधण्यात आले असून रंगकाम देखील उत्तम असे आहे.
टाकीच्या मागच्या बाजूला २ अज्ञात वीरांच्या समाधी दिसतात. त्यापुढे दगडात बांधून काढलेले तलाव आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या देखील केलेल्या आहेत.
संदर्भ
संपादनबाहय दुवे
संपादन- छायाचित्रे वारूगड[permanent dead link]
- वारुगडवरील लेख Archived 2011-03-16 at the Wayback Machine.(मराठी)
- वारूगडवरील लेख(इंग्रजी)