वायफळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== वायफळे गावाला पश्चिम दिशेला चौर्या चा डोंगर आहे तसेच तिथे पवनचक्की प्रकल्प उभे आहेत. गावाला 2 प्रमुख तळी आहेत एक तलेवस्ती चे तळे आणि एक गावा जवळ चे मोठे सिद्धेवाडी तळे.सिद्धेवाडी तळे हे अग्रणी नदी वर बांधले आहे.

  ?वायफळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर तासगांव
जिल्हा सांगली जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

हवामान

संपादन

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

संपादन

==प्रेक्षणीय स्थळे== चौर्या चा डोंगर विशेषतः पावसाळी दिवसात इथे धुके थंड वारे वाहते.तसेच सिद्धेवाडी तळे येथें आगोस्ट महिन्यात धबधबा चालू असतो.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा एक छान आहे.

आजू बाजूच्या डोंगरावर पवन चक्क्या बसवलेल्या आहेत. त्या फिरताना जवळून पहाणे; हा अनुभव वेगळाच आहे.

परिसरात मोरांची संख्या लक्षणीय आहे. मोर नाचतानाचा नजारा पहाण्यासारखा असतो.

नागरी सुविधा

संपादन

वायफळे गावाला सर्व पायाभूत सुविधा आहेत. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांचा श्रेणी 'अ' चा दवाखाना, हॉस्पिटल्स, मेडिकल्स आहेत. वायफळे हे गाव राज्य महामार्ग 136 ला जोडले गेलेले आहे, गावामध्ये एसटी बसेसच्या सुविधा आहेत

जवळपासची गावे

संपादन

वायफळे गावच्या उत्तर दिशेस करंजे, वायव्य दिशेस धोंडेवाडी, पश्चिमेस मांजर्डे, नैऋत्य दिशेस गौरगाव, दक्षिण दिशेस बिरणवाडी, आग्नेय दिशेस सिद्धेवाडी व सावळज, पूर्व दिशेस दहिवडी, ईशान्य दिशेस यमगरवाडी व जरंडी ह्या गावच्या सीमा लागलेल्या आहेत

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate