वाजसनेयी संहिता
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
काश्मिरी विद्वान मम्मट (इ.स. सुमारे ११००) हा एक मोठा संस्कृत साहित्यशास्त्रकार होऊन गेला. कैयट आणि उवट असे दोन कनिष्ठ बंधू त्याला होते. ह्या दोन बंधूंना त्यानेच विद्या शिकवली. उवट हा शुक्ल यजुवेंदाच्या वाजसनेयी संहितेवरील भाष्याचा कर्ता म्हणून ओळखला जातो.
वाजसनेयी संहितेमध्ये तांदूळ, जव(=यव,सातू), मूग, उडीद, तीळ, गहू, मसूर वगैरे धान्यांची यादी दिलेली आहे. ही धान्ये कोणत्या ऋतूत पेरावयाची यांचाही उल्लेख आहे.(१८.१२)
धंदे आणि व्यवसाय यांची माहिती वाजसनेयी संहितेत (३०.७) येथे आहे. उदा० मच्छीमार (=धीवर,दाश किंवा कैवर्त), कीनाश (=शेतकरी), वप(=पेरणी करणारे), धोबी, मणिकार, वेताचे काम करणारे विदलकारी, दोरखंड वळणारे, रथ बनवणार, धनुष्ये बनवणारे, इषुकार (बाण बनवणारे), लोहार, सोनार, कुंभार, वनपाल, जंगलातला वणवा विझवणारे, गायी पाळणारे, वैद्य, वस्त्रांवर विणकम करणारे वगैरेंचे उल्लेख वाजसनेयी संहितेत आहेत. शिवाय समुद्री प्रवासासाठी मोठ्या बोटी कशा बनवायच्या हेही वाजसनेयी संहितेत (३१.७) आहे.
१०८०० विटा वापरून पंख पसरलेल्या गरुडासारखी दिसणारी यज्ञाची वेदी कशी तयार करायची हे वाजसनेयी संहितेत ११.१८ येथे आहे. विणकर जे आडवे उभे धागे विणतात त्यांना ताणा-बाणा म्हणतात. अशा वेळा विणताना ताण्याला वजनदार शिशाची गोळी टांगत, असे यजुर्वेदातील वाजसनेयी संहितेत १९.८० येथे म्हटलेआहे.
आधुनिक अर्थ : वाजसन म्हणजे कृषक. वाजपेय यज्ञ म्हणजे अन्न आणि पेय (म्हणजे पाणी) यासाठी केला जाणारा विधी, असे सुप्रसिद्ध विचारवंत स. रा. गाडगीळ यांचे मत आहे.
(अपूर्ण)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |