वागूळसार
वागुळसार हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. हा भाग उत्तर कोकणात मोडतो.
हे गाव पालघर तालुक्यातील पालघर-माहीम रस्त्यावर पालघर रेल्वे स्थानकापासून २ किमीवर वसलेले आहे. येथील वृक्षांवर पूर्वी दिवसभर असंख्य वटवाघळे उलटी टांगलेली असायची आणि त्यामुळे पूर्वी वाघुळसार नावाने ओळखले जाणारे हे शब्दाचा अपभ्रंश होऊन वागुळसार नावाने प्रसिद्ध झाले.
लोकजीवन
संपादनमुख्यतः भंडारी व आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. भातशेती, बागायती, आणि ताडीधंदा हे मुख्य व्यवसाय केले जातात. जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, बकरी-शेळीपालन हे व्यवसायसुद्धा थोड्या प्रमाणात केले जातात. मुंबई जवळ असल्याने काही लोक सरकारी खासगी नोकरीसाठी रोज ये-जा करीत असतात.
नागरी सुविधा
संपादनसार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा माहीम ग्रामपंचायतीतर्फे पुरविल्या जातात. पालघरहून वडराई, केळवे, सफाळे, दातिवरे, एडवण, उसरणीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस ह्या ठिकाणी थांबतात. ऑटोरिक्षाने सुद्धा पालघरहून येथे येता येते. येथे बसथांब्याजवळ गणपती मंदिर आहे. दरवर्षी माघ महिन्यात गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. शेकडो भाविक देवदर्शन व भंडारा प्रसाद घेण्यासाठी येथे येतात. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो.
संदर्भ
संपादनhttps://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc