वाईची लढाई
मुघल-मराठा युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक डिसेंबर १६८७
स्थान वाई, महाराष्ट्र
परिणती मराठ्यांचा विजय
प्रादेशिक बदल नाहीत
युद्धमान पक्ष
मुघल साम्राज्य मराठा साम्राज्य
सेनापती
औरंगझेब, सर्जा खान हंबीरराव मोहिते
सैन्यबळ
७०,००० पायदळ, १७,००० चपळ घोडेस्वार, ३,००० चिलखती घोडेस्वार ३५,००० पायदळ, ९-१०,००० चपळ घोडेस्वार, ५-६,००० चिलखती घोडेस्वार
बळी आणि नुकसान
२५-३५,००० ९-१०,०००
मराठा सेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थी

 

वाईची लढाई १६८७ च्या शेवटी महाराष्ट्रातील वाई शहराजवळ झालेली लढाई होती.

मुघल-मराठा युद्धाचा एक भाग असलेली ही लढाई मुघल सरदार सर्जाखान आणि मराठा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली लढली गेली.

रायगड जिंकण्याच्या उद्देशाने मुघल सम्राट औरंगजेबाने पाठवलेल्या सर्जाखानाचा प्रतिकार करण्यासाठी छत्रपती संभाजींनेी मोहित्यांना देशावर पाठविले असता त्यांनी वाईजवळ सर्जाखानास गाठले. या मुघलांचा पराभव झाला. [१]

पार्श्वभूमी संपादन

एप्रिल १६८५ च्या सुमारास मुघल सम्राट औरंगजेबने काही मराठा सरदारांची वतने काबीज केली व नंतर दक्षिणेतील शाह्यांचा नायनाट करण्यासाठी तो गोलकोंडा आणि विजापूर वर चालून गेला. ही दोन्ही मुस्लिम राज्ये काबीज करून त्याने दख्खनेतील आपली सत्ता मजबूत केली. यानंतर त्याने आपली नजर औरंगजेब मराठ्यांवर केंद्रित केली. [२] औरंगजेब गोलकोंडाच्या वेढ्यात असतानाच मुघलांनी साताऱ्यावर आक्रमण केले.

लढाई संपादन

सर्जा खान हा मूळचा विजापुरी सरदार मुघल सैन्य घेउन रायगड कडे निघाला. [३] त्या अडविण्यासाठी मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्याला वाईजवळ गाठले. घनघोर लढाईनंतर मराठ्यांचा विजय झाला. या दरम्यान हंबीराव मोहिते लढाईत तोफेच्या गोळ्याने मारले गेले. [४]

परिणाम संपादन

हंबीररावांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी यांनी मोहित्यांच्या जागी मालोजी घोरपडे यांची सरसेनापतीपदी नियुक्ती केली. [५]

ही लढाई जरी मराठ्यांनी जिंकली तरीही मातब्बर सरदार मोहिते यांच्या मृत्यूमुळे छत्रपती संभाजींची राजकीय स्थिती कमकुवत झाली. त्यांच्याकडी अनेक सरदार त्यांना सोडून शत्रूस मिळाले. [६] हे पाहता छत्रपती संभाजी आपला जवळचा मित्र आणि सल्लागार कवी कलश यांच्यासह घाटावरुन कोंकणात गेले. थोड्यात काळात मुघलांनी त्यांच्या छावणीला संगमेश्वराजवळ वेढा घातला व त्यांना धरून औरंगझेबाकडे नेले. [६]

संदर्भ संपादन

  1. ^ Kincaid, C. A. (1922). A history of the Maratha people (Vol. 2). H. Milford, Oxford university press. p 48
  2. ^ "Maharashtra State Gazetteers: Satara" Maharashtra (India), Gazetteers Dept. Director of Government Printing, Stationery and Publications, Maharashtra State, 1963 p94
  3. ^ Pāṭīla, Śālinī. Maharani Tarabai of Kolhapur, C. 1675-1761 AD. New Delhi: S. Chand & Company, 1987. p42
  4. ^ Joshi, Pandit Shankar. Chhatrapati Sambhaji, 1657-1689 AD. New Delhi: S. Chand, 1980. p241
  5. ^ Joshi, Pandit Shankar. Chhatrapati Sambhaji, 1657-1689 AD. New Delhi: S. Chand, 1980. p262
  6. ^ a b Mehta, Jaswant Lal. Advanced Study in the History of Modern India 1707-1813. Sterling Publishers Pvt. Ltd, 2005. p49-50