कवी कलश - जेव्हा छत्रपती राजे श्री शिवराय आपल्या बाळासह म्हणजेच संभाजीराजे यांच्या सह आग्ऱ्याच्या कैदेत होते तेव्हा त्यांना भेटण्याकरिता दोन पंडित आले होते एक होते कवींद्र परमानंद आणि दुसरे कवी कुलेश जे अलाहबाद चे होते.ते राजांची कीर्ती ऐकून त्यांना खासे भेटण्याकरिता आलेले.राजांनी त्या कैदेतून सुटायचे हे अगोदरच ठरवले होते त्यासाठी त्यांनी कवी कलश परमानंद यांना राजांनी आणलेले हत्ती, अश्व या पैकी काहीच आग्ऱ्यात ठेवाचे नसल्या कारणाने ते त्यांना भेट दिले असे औरंगजेबाला सांगून ते मथुरेकडे न्यायला सांगितले. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर राजे आणि शंभूराजे हे जेव्हा मथुरेला कृष्णाजी पंत व केशव पंत यांच्या घरी मुक्काम केला जे मोरोजी पंत पिंगळे यांचे मेव्हणे होते. लांबचा पल्ला असल्याकारणाने राजांनी आपल्या रुद्ररूपी शंभू बाळांना कृष्णाजी पंतांच्या निवासस्थानी काही दिवस राहा आम्ही काही दिवसांनी तुम्हाला सुखरूप गडावर सैन्यानिशी आणू त्यावेळी त्यांना कवी कुलेश सोबती होते खूप दिवस शंभूराजे आणि कवी कुलेश एकत्र मथुरेला होते त्यात त्यांची मैत्री जुळली आणि ती मैत्री इतिहासात कोरली जावी अशी होती. दोघेही औरंगजेबाच्या कैदेत असताना एवढे भयंकर हाल सोसून देखील दोघांनीही मृत्यूला कवटाळणे पसंद केले पण त्या औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाहीत